महाराष्ट्र | कोल्हापूरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वाळपईत बेकायदा चिकन विक्री दुकानांत वाढ

03:21 PM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन, घाणीचे साम्राज्य, रोगराईची भीती : पालिकेचे दुर्लक्ष : आरोग्य खात्याने सर्वेक्षण करण्याची मागणी 

Advertisement

वाळपई : वाळपई पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी बेकायदेशीर चिकन सेंटरची दुकाने सुरू झाली आहेत. मात्र पालिकेचे यावर कोणतेही नियंत्रण नाही. मार्गदर्शक तत्त्वांची अजिबात अंमलबजावणी होत नाही.चिकन दुकानवाले कोंबड्या साफ केलेली घाण तिथेच टाकतात त्यामुळे दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.वाळपई पालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज पालिका उद्यानानजिक असलेली चिकन सेंटरची दुकाने पालिकेने बाजारातील मार्केट कॉम्प्लेक्समध्ये हलविली आहेत. पहिल्या मजल्यावर गिऱ्हाईक येत नसल्याने या दुकानांना धंदा मिळत नाही. यामुळे अनेक ठिकाणची सेंटर इमारतीमध्ये बंद आहेत.

Advertisement

पालिकेने याचे सर्वेक्षण करून बेकायदा असलेली चिकनची दुकाने त्वरित बंद करावीत,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. पालिका उद्यानाचे काम हाती घेतल्यानंतर पालिकेने सदर चिकन विक्री दुकाने मासळी मार्केटच्या पहिल्या मजल्यावर स्थलांतरित केली.  याठिकाणी अपेक्षित धंदा होत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यांनी अनेकवेळा वाळपई पालिकेशी संपर्क साधून सदर इमारतीऐवजी इतरत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. पहिल्या मजल्यावर सहसा ग्राहक जात नाही. यामुळे तळमजल्यावर व्यवस्था करण्याची विनंती केली, मात्र त्यांची विनंती अद्याप मान्य झाली नाही.

बेकायदा चिकन विक्री दुकानांचा सुळसुळाट

पालिका उद्यानानजिक असलेली दुकाने बंद केल्यानंतर याचाच फायदा घेऊन पालिकेच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी बेकायदा चिकन विक्रीची दुकाने थाटली आहेत. रस्त्याशेजारीही दुकाने सुरू आहेत. यामुळे मार्गदर्शक तत्त्वांना फाटा दिल्याचे चित्र आहे. दुकानातील कचऱ्याची विल्हेवाट, सांडपाण्याच्या व्यवस्थेबाबत संबंधित दुकानदारांकडून कोणतेही नियोजन केले नाही. यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष : नागरिकांचा आरोप

बेकायदा चिकन विक्री दुकानांकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे आसपासच्या भागात रोगराईची भीती आहे. बेकायदेशीर चिकन विक्रीची दुकाने बंद करावीत. मागणी नागरिकांतून केली जात आहे. अशा पालिकेकडे नोंद नसलेल्या बेकायदा चिकन विक्री दुकानांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तरीही चिकनची भरमासाठ दराने विक्री केली जाते. अशा या विक्रीवर नियंत्रण कोण ठेवणार ? असा सवाल नागरिकांतून होत आहे.

आरोग्य खातेही मूग गिळून गप्पच

वाळपईत अनेक ठिकाणी बेकायदा चिकन विक्री दुकाने सुरू आहेत. याकडे  पालिका तसेच आरोग्यखात्याच्या यंत्रणेने बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे मात्र आरोग्य खात्याची यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.आरोग्यखात्याने तसेच पालिका प्रशासनाने अशा बेकायदा चिकन विक्री दुकानांचे सर्वेक्षण करावे व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article