महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विम्बल्डन स्पर्धेच्या बक्षीस रकमेत वाढ

06:23 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

जागतिक टेनिस क्षेत्रामध्ये प्रतिष्ठेची समजली जाणारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षीस रकमेमध्ये विक्रमी वाढ करण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला आहे.

Advertisement

विम्बल्डन स्पर्धेतील विविध गटातील विजेत्यांना आता विक्रमी 50 दक्षलक्ष पाउंड्सची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. पुरुष आणि महिला एकेरीतील विजेत्यांना आता प्रत्येकी 2.7 दक्षलक्ष पाउंड्सची रक्कम मिळणार आहे. विम्बल्डन स्पर्धेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 2024 च्या टेनिस हंगामातील जुलै महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या टेनिसपटूंना पूर्वीच्या तुलनेत बक्षीस रकमेत प्रचंड वाढ मिळणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत बक्षीस रकमेमध्ये 11.9 टक्के वाढ करण्यात आली आहे. पुरुष आणि महिला विभागामध्ये सहभागी होणाऱ्या टेनिसपटूंना याचा अधिक लाभ मिळणार आहे. या दोन्ही विभागात पहिल्या फेरीत पराभूत होणाऱ्या टेनिसपटूला 60 हजार पाउंड्स रक्कम मिळणार आहे. विम्बल्डन स्पर्धा ही ग्रासकोर्टवर खेळवली जात असून परंपरेनुसार जागतिक दर्जाच्या टेनिसपटूंच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेला शौकिनांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे अखिल इंग्लंड टेनिस फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले. 2024 ची विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा 1 ते 14 जुलै दरम्यान खेळवली जाणार आहे.

 

Advertisement
Next Article