महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सलग सुट्यांमुळे प्रवासी संख्येत वाढ

06:03 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मध्यवर्ती बसस्थानकात गर्दी : लांबपल्ल्यासह स्थानिक बससेवेवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

सलग सुट्यांमुळे प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. शनिवारी सकाळपासूनच मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली होती. सलग तीन दिवस सुटी असल्यामुळे सरकारी कर्मचारी व इतरांनी बाहेर पडणे पसंत केले. त्यामुळे लांबपल्ल्यासह स्थानिक बससेवेवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण वाढला होता.

दुसरा शनिवार, रविवारी शासकीय सुटी तर सोमवारी ईद-ए-मिलादनिमित्त सुटी  आहे. त्यामुळे बहुतांशी नोकरदार आणि कर्मचाऱ्यांची ये-जा वाढली आहे. त्यामुळे बसथांब्यांवरही प्रवाशांची वर्दळ पहावयास मिळाली. विशेषत: मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली होती.

विशेषत: कोल्हापूर, निपाणी, चिकोडी, पुणे, मुंबई, बेंगळूर, हुबळी, धारवाड, बेळ्ळारी, गोवा आदी मार्गांवर प्रवाशांची संख्या वाढली होती. गणेशोत्सव काळातच सलग तीन दिवस मिळाल्यामुळे प्रवाशांची ये-जा सुरू होती. सुटीच्या काळात बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे शनिवारी मध्यवर्ती बसस्थानकात हजारो प्रवाशांनी गर्दी केली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article