दूरसंचार ग्राहकांच्या संख्येत वाढ
देशातील ग्राहकांचा समावेश : वाढीसोबत संख्या 117 कोटीच्या घरात
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशामध्ये दूरसंचार ग्राहकांची संख्या जून महिन्यात काहीशी वाढून 117.29 कोटींवर पोहोचली आहे. या कालावधीत रिलायन्स जिओने सर्वाधिक ग्राहक जोडले आहेत, अशी माहिती दूरसंचार नियामक ट्राय यांच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
मे 2022 मध्ये दूरसंचार ग्राहकांची संख्या ही 117.07 कोटी होती. तर देशात टेलिफोन ग्राहकांची संख्या जून 2022 मध्ये 0.19 टक्क्यांनी वधारुन ती 1,17.29 कोटीच्या घरात पोहोचली आहे. जी मे 2022 मध्ये 117.07 कोटी राहिल्याची नोंद केली आहे. यासह वायरलेस ग्राहकांची संख्या जूनमध्ये वाढून 41.3 कोटीवर राहिली. तर कंपन्यांनी 42.23 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत.
भारती एअरटेलच्या ग्राहकांची संख्या ही 7.92 लाखांनी वधारुन ती 36.29 कोटीवर गेली आहे. दुसऱया बाजूला व्होडाफोन आयडियाची ग्राहक संख्या कमी राहिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये बीएसएनएल आणि एमटीएनएल यांनी क्रमशः 13.27 लाख आणि 3,038 वायरलेस ग्राहक गमावले असल्याची नोंद आहे.