महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीयांचा व्हिसासंख्येत जर्मनीकडून वाढ

06:09 AM Oct 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान मोदी आणि चान्सेलर ओलाफ स्कोल्झ यांच्यातील भेटीनंतर महत्वाची घोषणा, संबंध दृढ करणार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

कौशल्यवान आणि प्रशिक्षित भारतीयांना दिल्या जाणाऱ्या वर्कव्हिसांच्या संख्येत जर्मनीने मोठी वाढ केली आहे. आतापर्यंत ही संख्या प्रतिवर्ष 20 हजार इतकी होती. ती आता साडेचारपट वाढवून प्रतिवर्ष 90 हजार इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे उच्चशिक्षित, तंत्रज्ञ आणि कौशल्यवान भारतीय युवकांना जर्मनीत काम करण्याची मोठी संधी या निर्णयामुळे प्राप्त झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सेलर ओलाफ स्कोल्झ यांच्यात शुक्रवारी दिल्लीत प्रदीर्घ चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आदानप्रदान, सांस्कृतिक सहकार्य आणि अन्य द्विपक्षीय विषयांवर बोलणी केली. दिल्लीतील प्रसिद्ध हैदराबाद हाऊस या वास्तूत दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेतली.

कौशल्यवान व्यक्तींना संधी

जर्मनीने भारतातून येणाऱ्या कौशल्यवान युवकांना अधिक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अकुशल कामगारांचे स्थलांतर कमी करण्याचाही निर्णय घेतला आहे. कुशल भारतीयांच्या व्हिसासंख्येत 20 हजार वरुन 90 हजार इतकी मोठी वाढ करण्यात आली आहे. जर्मनीमध्ये सध्या बेकायदेशीर स्थलांतराची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा बेकायदेशीर स्थलांतरीतांची संख्या कमी केली जाणार आहे. तसेच ज्यांनी बेकायदेशीरित्या प्रवेश मिळविला आहे, त्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्याचीही योजना जर्मनीने तयार केली आहे, असे जर्मनीचे चान्सेलर ओलाफ स्कोल्झ यांनी त्यांच्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे.

मुक्त व्यापार कराराच्या दिशेने

भारताशी मुक्त व्यापार करार करण्याची जर्मनीची इच्छा आहे. युरोपियन महासंघालाही भारताशी मुक्त व्यापार करार व्हावा असे वाटते. यासंबंधीची चर्चा मधल्या काळात बंद पडली होती. मात्र, ती 2022 पासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मुक्त व्यापार करार झाल्यास भारत, जर्मनी आणि युरोपियन महासंघ अशा तिघांचाही लाभ होईल, अशी स्कोल्झ यांची अपेक्षा आहे. भारतची भूमिकाही यासंबंधी सकारात्मक असून काही मुद्द्यांवर तोडगा निघाल्यास जर्मनीशी मुक्त व्यापार करार केला जाऊ शकतो, अशी शक्यता तज्ञांनी बोलून दाखविली आहे.

तंत्रज्ञान, संरक्षण सहकार्य 

जर्मनीचे चान्सेलरपद मिळाल्यापासून ओलाफ स्कोल्झ यांचा हा प्रथम भारत दौरा आहे. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रत्यक्ष एकास एक चर्चा केली. भारताशी तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात निकटचे सहकार्य करण्याची जर्मनीची इच्छा असून भारताला याचा मोठा लाभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जर्मनी तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रात जगातील एक महाशक्ती म्हणून ओळखला जातो. तर भारताकडे तंत्रकुशल मानवबळ मोठ्या प्रमाणावर आहे. या दोन्हींचा संगम झाल्यास मोठी प्रगती होऊ शकते, अशी अनेकांची भावना आहे.

घुसखोरीची समस्या जर्मनीतही

जर्मनीत भारतातून बेकायदेशीर स्थलांतर होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, पाकिस्तान आणि उत्तर आफ्रिकेतील देशांमधून अशा घुसखोरीचे प्रमाण अधिक असून ती मोठी समस्या या देशासमोर आहे, असे अनेक तज्ञांनीही स्पष्ट केले आहे. या बेकायदेशीर घुसखोरीमुळे जर्मनीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक शहरांमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा

ओलाफ स्कोल्झ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चेनंतर प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व प्रभावी आणि नव्या काळाचा वेध घेणारे आहे. त्यांनी जगात भारताला अधिक मान मिळवून दिला असून त्यांच्याशी सहकार्य करण्याची आमची इच्छा आहे. तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात असे सहकार्य मोठ्या प्रमाणात होऊ शकते. जर्मनी भारताला त्याच्या विकासात साहाय्य करण्यास सज्ज असून संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत-जर्मनी सहकार्यास उत्सुक

ड भारत आणि जर्मनी एकमेकांशी अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यास सज्ज

ड उच्च तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना ठरतील पूरक

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व दूरदर्शी असल्याची स्कोल्झ यांची प्रशंसा

ड कुशल भारतीयांची व्हिसासंख्या वाढविल्याचा मोठा लाभ भारतीयांना होणार

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article