कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आघाडीवरच्या 6 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 1.67 लाख कोटींची वाढ

06:16 AM Jun 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात शेअरबाजारातील दिग्गज 10 पैकी 6 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 1,62,288 लाख कोटी रुपयांची भर पडली असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेल व रिलायन्स इंडस्ट्रिज यांच्या बाजारमूल्यात मोठी वाढ झालेली होती. मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1289 अंकांनी किंवा 1.58 टक्के इतका वधारत बंद झाला होता. रिलायन्स, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक आणि इन्फोसिस यांच्या बाजार मूल्यात वाढ झालेली दिसून आली तर याउलट टीसीएस, एलआयसी, बजाज फायनान्स व हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या मूल्यात मात्र घसरण झालेली दिसली.

Advertisement

यांच्या मूल्यात वाढ

भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 54,055 कोटींनी वाढत 11,04,469 कोटींवर तर रिलायन्सचे बाजार भांडवल मूल्य 50,070 कोटींनी वाढत 19,82,033 कोटी रुपयांवर पोहचले होते. तर एचडीएफसी बँकेचे मूल्य 38,503 कोटींसह वाढत 15,07,281 कोटींवर आणि इन्फोसिसचे मूल्य 8,433 कोटींनी वाढत 6,73,751 कोटी रुपयांवर पोहचले होते. आयसीआयसीआय बँकेचे भांडवल मूल्य 8,012 कोटींनी वाढत 10,18,387 कोटींवर पोहचले होते तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे 3212 कोटींनी वाढत बाजार भांडवल 7,10399 कोटींवर पोहचले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article