महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘सुकन्या समृद्धी’च्या व्याजदरात वाढ

06:17 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केंद्र सरकारचा निर्णय, 3 वर्षे कालावधीच्या ठेवीदारांचाही लाभ

Advertisement

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

केंद्र सरकारने ‘सुकन्या समृद्धी’ योजनेवरील व्याजदरात 0.2 टक्के वाढ केली आहे. तसेच 3 वर्षे कालावधीच्या ठेवींवरील व्याजदरातही 0.1 टक्का वाढ करण्यात आली आहे. ही व्याजदरवाढ जानेवारी ते मार्च या आर्थिक तिमाहीकरता आहे. या दोन योजना वगळता इतर अल्पबचत योजनांवरील व्याजदर आहे त्याच स्थितीत ठेवण्यात आले आहेत. यामुळे सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2 टक्के, तर तीन वर्षे कालावधीच्या ठेवींवरील व्याजदर 7.1 टक्के इतका झाला आहे.

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) आणि बचत खात्यांवरील व्याजदर मात्र सध्याच्याच, अर्थात अनुक्रमे 7.1 टक्के आणि 4 टक्के असे कायम राखण्यात आले आहेत. किसान विकास पत्रावरील व्याजदर 7.5 टक्के असून या योजनेचा कालावधी 115 महिने असा कायम ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय बचत पत्र किंवा नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेटवरील व्याजदर 7.7 टक्के असून तो जानेवारी ते मार्च या तिमाहीकरिता आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

व्याजदर आहेत त्याच स्थितीत

मासिक प्राप्ती योजनेचा व्याजदर 7.4 टक्के असा कायम ठेवण्यात आला आहे. सरकारी बचत योजनांच्या व्याजदरांनी घोषणा प्रत्येक आर्थिक तिमाहीत केली जाते. त्यानुसार ती करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून टप्प्याटप्प्याने व्याजदर वाढवित आणले आहेत. याच धोरणाचा अवलंब केंद्र सरकारनेही केला आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना यामुळे लाभ होणार आहे.

नवे व्याजदर

सुकन्या समृद्धी योजना 8.2 टक्के

तीन वर्षांच्या ठेवी 7.1 टक्के

किसान विकास पत्र 7.5 टक्के

राष्ट्रीय बचत पत्र 7.7 टक्के

मासिक प्राप्ती योजना 7.4 टक्के

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article