For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आवकेत वाढ लसणाचे दर स्थिर

11:45 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
आवकेत वाढ लसणाचे दर स्थिर
Advertisement

किरकोळ बाजारात प्रतिकिलो 250 रुपये

Advertisement

बेळगाव : पंधरा दिवसांपूर्वी प्रतिकिलो 400 रुपये झालेल्या लसणाचा दर काहीसा खाली आहे. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे. लसणाच्या दरात अचानक वाढ झाल्याने फोडणीतून लसूण गायब झाली होती. मात्र आता किरकोळ बाजारात लसणाचा दर प्रतिकिलो 250 ते 280 रुपयांवर स्थिर झाला आहे. आवक वाढत असल्याने लसणाचा दर खाली आला आहे. दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढत जात असल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. डाळी, कडधान्य आणि भाजीपाला पाठोपाठ लसणाच्या किमतीही वाढल्या होत्या. प्रतिकिलो 400 ते 450 रुपयांनी लसूण विकली जात होती. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करणे अशक्य झाले होते. आता लसणाचा दर काहीसा कमी झाला आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे त्रासदायक ठरू लागले आहे. सध्या स्थिर झालेल्या लसणाच्या किमती मार्चमध्ये कमी होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. आवक वाढल्यानंतर येत्या दिवसात दर खाली येण्याचा अंदाज आहे. नवीन लसूण बाजारात वाढल्यानंतर ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.