कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बसथांब्यांवर छप्पर नसल्याने गैरसोय

12:07 PM Nov 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संबंधित विभागाने लक्ष देऊन योग्य आसन व्यवस्था करण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : राणी चन्नम्मा सर्कल परिसर हा सततच्या वर्दळीचा भाग आहे. या परिसरात रुग्णांसह, प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. दरम्यान बिम्सच्या नूतन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसमोर असलेल्या जुन्या बसथांब्याचे छप्पर काढण्यात आल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांना उन्हात बसावे लागत आहे. सदर परिस्थिती शहर परिसरात विविध ठिकाणी दिसून येत आहे. यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन जुन्या बसथांब्यांना छप्पर बसवून, योग्य आसन व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

Advertisement

राणी चन्नम्मा सर्कलमध्ये दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. सर्कलनजीकच जिल्हाधिकारी कार्यालय, जि. पं. न्यायालय, सिव्हिल हॉस्पिटलसह विविध सरकारी कार्यालये कार्यरत आहेत. यामुळे या परिसरात नेहमी जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांसह शहर, उपनगर व ग्रामीण भागातील नागरिक आपले काम उरकण्यासाठी येत असतात.तसेच शहर, उपनगरे व ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठ्या संख्येने या परिसरातून प्रवास करत असतात.

जुन्या बसथांब्यांवर छप्पर बसवून आसन व्यवस्था करा

नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असली तरी त्यांच्यासाठी बसथांब्यांची संख्या नगन्य आहे. बसथांबे असले तरी ते गर्दीने हाऊसफुल्ल असतात. संबंधित विभागाकडून ठिकठिकाणी स्मार्ट बसथांबे निर्माण करण्यात आले आहेत. मात्र जुन्या बसथांब्यांकडे दुर्लक्ष करून त्यांचे छप्परही काढण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांना उन्हातच बाकडांवर बसावे लागत असून, त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी जुन्या बसथांब्यांवर छप्पर बसवून योग्यरिता आसन व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article