महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयकर भरणाऱ्याकडे बीपीएल कार्ड

11:15 AM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नागरी पुरवठा खात्याने पाठवली नोटीस

Advertisement

बेळगाव : आयकर भरणाऱ्यांनीही बीपीएल कार्डे मिळविली आहेत. बेळगावात असे अनेक प्रकार उघडकीस आले असून पॅनकार्डमुळे हे प्रकार उघडकीस आल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने अशा प्रकरणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पांगुळ गल्ली येथील एका रेशन दुकानाच्या कार्यक्षेत्रात बीपीएल कार्ड असणाऱ्या सुरेश यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. बीपीएल कार्ड दारिद्र्या रेषेखालील नागरिकांसाठी आहे. आयकर भरणारेही याला पात्र कसे ठरले? असा प्रश्न उपस्थित करून चौकशीसाठी नोटीस देण्यात आली आहे. नोटीस पोहोचल्यानंतर तीन दिवसांत आयकर भरल्यासंबंधी कागदपत्रांसमवेत स्वत: हजर होऊन माहिती द्यावी. नहून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या नोटिसीने एकच खळबळ माजली असून बेळगावात अशा अनेक अपात्रांना बीपीएल कार्डे वितरित करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article