For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोत्यांची शेतीतून लाखो रूपयांची मिळकत! दहावी पास तरूणाची कमाल

06:25 PM Mar 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
मोत्यांची शेतीतून लाखो रूपयांची मिळकत  दहावी पास तरूणाची कमाल
farming of pearls Kolhaur
Advertisement

दिलीप कांबळे सडोली दुमालात पिकवतात मोती; इच्छाशक्तीच्या बळावर फुलवला मोत्यांच्या शेतीचा व्यवसाय

अहिल्या परकाळे कोल्हापूर

स्वाती नक्षत्राचा थेंब समुद्रातील शिंपल्यांच्या पोटात पडल्यानंतर शिंपले तयार होतात, अशी अख्यायिका ऐकायला मिळते. परंतू शास्त्रीयदृष्ट्या शिंपल्यात घनपदार्थ गेल्यानंतरच मोती तयार होतो. त्यामुळे मोत्यांची शेती करताना गोड्या पाण्यातील शिंपले आणून त्यांचे प्री-ऑपरेटीव्ह पाच दिवस त्यानंतर शिंपल्यांची शस्त्रक्रिया करून शरिरात न्युक्लेस सोडल्यानंतर पाच दिवस अतिशय काळजी घ्यावी लागते. या शिंपल्यांना त्रास होवून त्यातून विशिष्ट प्रकारचा स्त्राव बाहेर पडतो. नेकर सिक्रेट केल्यानंतर मोती तयार होतो. सडोली दुमाला येथे दहावी पास दिलीप कांबळे 2018 पासून सोप्या पध्दतीने एक्स्पोर्ट मोत्यांची शेती करून लाखो रूपये उत्पन्न घेतात. त्यांची शेती पाहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात मोती मिळवण्याचे केंद्र उभारले आहे. मोत्यांची शेती कशी करायची यासंदर्भात कांबळे यांच्याशी दैनिक तरूण भारतने संवाद साधला असता त्यांनी मोत्यांची शेती कशा प्रकारे केली जाते, त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो, यासंदर्भात माहिती दिली आहे.

Advertisement

कांबळे म्हणाले, मोत्यांची शेती दहा बाय दहाच्या जागेत किंवा टेरेसवरही करता येते. 52 प्रकारच्या मोत्यांच्या प्रजाती आहेत. भारतात 3 प्रकारच्या प्रजातीचे मोती पिकवले जातात. परंतू भारतात गोड्या पाण्यातील शिंपले आणून पाच दिवस त्यांची प्री-ऑपरेटीव्ह काळजी घेतली जाते. पाच दिवसानंतर शिंपल्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या शरीरात न्युक्लेस सोडले जातात. या मोत्यांची तीन महिन्यांनी पाहणी करून मोती तयार होतो की नाही, हे पाहावे लागते. शिंपल्यांना शेवाळ, लॅमेलेडिंग, पेरीशिया कोरूटागा खायला टाकले जाते. मोती तयार होण्यासाठी 12 ते 24 महिन्यांचा कालावधी लागतो. डिझायनर मोती 12 महिने, एमओपी मोती 18 महिने, अनियमित मोती 24 ते 30 महिने कालावधी मोतीचे उत्पन्न येण्यासाठी लागतो. या कालावधीत शिंपल्यांना पुरेसे व पूरक अन्न द्यावे लागते. शिंपल्यांचे ऑपरेशन करून त्यांना गोड्या पाण्याच्या टाकीत ठेवले जाते. पाण्याच्या क्षमतेप्रमाणे त्यामध्ये शिंपले सोडले जातात. वारंवार पाण्याची तपासणी करून त्यांना हिरवे शेवाळे खाण्यासाठी दिले जाते. दीड वर्षनंतर मोती बाहेर काढल्यानंतर मोत्यावर प्रक्रिया करून, कटींग, पॉलिशिंग फिनिशिंग केले जाते. त्यानंतर सोने, चांदी कोणत्या धातूमध्ये पाहिजे तसे मढवून विक्री केली जाते. दिल्लीसह परदेशातही या मोत्यांची विक्री केली जाते.

वार्षिक उत्पन्न 4 ते 5 लाख
महावितरणमधील नोकरी सांभाळत मी मोत्यांची शेती करतो. 2015 मध्ये सुरूवातीला मोत्यांच्या शेतीत माझा तोटा झाला. परंतू त्यांनी नागपूरसह महाराष्ट्रासह सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर एक्वाकल्चर (ण्घ्इA), ओडिशात प्रशिक्षण पूर्ण केले. 2018-2019 मध्ये 5 हजार आणि 18 हजार 500 मोती सेटअप केले आणि न डगमगता मेहनत केली. या मोत्यांना 2021 मध्ये प्रति मोती 2 हजार रुपये दर मिळाला. 4 ते 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळत आहे.

Advertisement

वेगवेगळ्या डिझाईनच्या मोत्यांची शेती
डिझाईनचे वेगवेगळ्या आकारात मोती पिकवत असल्याने या मोत्यांना चांगला दर मिळत आहे. तेथून आजतागायत मी माझी नोकरी सांभाळत मोत्यांची शेती उत्तम प्रकारे करीत आहे. जागतिक दर्जाच्या एका मोत्याची किंमत 400 ते 2 हजार रूपयांपर्यंत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोत्यांची शेती करावी म्हणून मी देशभरातील 150 शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले असून, संपूर्ण भारतात 17 ठिकाणी मोत्यांची शेती प्रकल्प सुरू आहेत.

मोत्याची शेती उत्पादनावरील पुस्तक लवकरच प्रकाशित होणार
दहा बाय दहाच्या जागेत तलाव तयार करून त्यामध्ये मोत्यांची शेती करता येते. प्रगत तंत्रज्ञान वापरून घरच्या घरी 5 ते 6 फुटाची गोड्या पाण्याची टाकी बनवून त्यामध्ये मोत्यांचे उत्पन्न घेता येते. त्यामुळेच कॉलेजमधील मुलांनाही प्रशिक्षण देतो. मोत्यांची शेती कशी करायची यासंदर्भात पुस्तक लिहले असून, शिवाजी विद्यापीठामार्फत लवकरच हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे.

Advertisement
Tags :

.