महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

समावेशकता, गरीबी उन्मूलन हेच ध्येय !

06:59 AM Nov 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ब्राझीलमध्ये जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, परिषदेची प्रशंसा

Advertisement

वृत्तसंस्था / रिओ-डी-जानेरो

Advertisement

‘सामाजिक समावेशकता साधणे, तसेच गरीबी आणि भूक यांचे उन्मूलन कारणे हेच आमचे ध्येय आहे. यासाठी आम्ही पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून उपाययोजना करीत आहोत,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलची राजधानी रिओ-डी-जानेरो येथे आयोजित जी-20 शिखर परिषदेत केले आहे. या परिषदेच्या 19 व्या बैठकीत ते भाषण करीत होते.

या परिषदेला अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जोसेफ बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान केर स्टार्मर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग तसेच या परिषदेचे सदस्य असणाऱ्या इतर सर्व देशांचे सर्वोच्च नेते उपस्थित आहेत. हवामान परिवर्तताही टिकून राहतील अशी पिके आणि सेंद्रीय शेती यावर आम्ही भर देत आहोत. गरीबी आणि भूक मिटविणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आम्ही भारताच्या 25 कोटी नागरीकांना अतिगरीबीतून बाहेर काढले आहे, असेही प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.

पाच मुद्द्यांवर दिला भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मुख्यत: 5 मुद्द्यांवर भर दिला. या पाच मुद्द्यांमध्ये गरीबी आणि भूक हे मुद्दे प्रमुख होते. तसेच त्यांनी ‘बॅक टू बेसिक्स अँड मार्च टू फ्युचर’ असेही नवे सूत्र मांडले. आधुनिकतेचा स्वीकार करताना आपण आपली परंपरा आणि त्या परंपरेने दिलेले ज्ञान विसरता कामा नये. या दोन्हींची सांगड घालूनच आपल्याला भविष्यकाळातील आव्हाने स्वीकारता येतील. पारंपरिक तृणधान्यांची लोकप्रियता वाढविणे, सेंद्रीय शेतीवर भर देणे, कृषी उत्पादन वाढविणे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. भूक मिटविण्याचा प्रयत्न म्हणून  आम्ही 80 कोटी लोकांना विनामूल्य धान्य देत आहोत, यावर त्यांनी भर दिला.

दक्षिण गोलार्धाचा मुद्दा

दक्षिण गोलार्धातील देशांमध्ये खते, इंधन आणि अन्न यांची मोठी कमतरता आहे. या कमतरतेमुळेच मोठे सामाजिक वाद आणि संघर्ष निर्माण होत आहेत. दक्षिण गोलार्धातील अनेक देश गरीब आहेत. त्यांना या कमतरतेशी जुळवून घेणे कठीण जात आहे. या देशांचा विचार करणे हे जी-20 सारख्या संघटनांचे कार्य आहे. समावेशकता हे प्रमुख सूत्र आहे, अशी मांडणी त्यांनी केली.

ब्राझीलची प्रशंसा

सर्वसामान्य जनता केंद्रीत निर्णय घेण्याचा प्रघात गेल्या वर्षी भारताकडे जी-20 परिषदेची अध्यक्षता होती, तेव्हा पाडला गेला. आता ब्राझीलनेही भारतात प्रारंभ झालेले कार्य पुढे नेले आहे. यासाठी ब्राझील प्रशंसेस पात्र आहे. ज्या कारणांसाठी जी-20 परिषदेची स्थापना झाली, त्या कारणांच्या पूर्ततेसाठी आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या परिश्रम केले पाहिजेत, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

अन्नसुरक्षा प्रकल्प अनन्यसाधारण

जी-20 परिषदेने हाती घेतलेला अन्नसुरक्षा प्रकल्प स्तुतीयोग्य आहे. जगातील गरीब आणि ‘नाहीरे’ श्रेणीतील लोकांसाठी हा प्रकल्प एक वरदान ठरणार आहे. भारत या प्रकल्पाला शक्य होईल तितके साहाय्य करेल. हा प्रकल्प यशस्वी होणे हे आपल्या साऱ्यांचे उत्तरदायित्व आहे, ही बाब त्यांनी प्रामुख्याने भाषणात मांडली.

या प्रमुख मुद्द्यांवर दिला भर

ड जगातील निम्नउत्पन्न वर्गातील लोकांची अन्नसुरक्षा हा महत्वाचा प्रकल्प

ड दक्षिण गोलार्ध देशांमधील अन्नतुटवड्याकडे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक

ड एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या सूत्रानुसार परिषद सतत कार्यरत

ड भारतात प्रारंभ झालेले कार्य ब्राझीलने पुढे नेले, यासाठी हा देश

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article