महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बॅलेट पेपरवर मराठीतून नावे समाविष्ट करा

10:47 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर मराठीतून नावे समावेश करावी तसेच माहिती आणि मतदारयादी मराठी भाषेतून उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कारवारच्या जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कारवार लोकसभा मतदारसंघातील खानापूर, हल्याळ, जोयडा व कारवार भागात मराठा समाज व मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तसेच कोकणी भाषिकदेखिल अधिक संख्येने आहेत. या सर्वांच्या सोयीसाठी निवडणूक प्रक्रियेवेळी बॅलेट पेपरवर फक्त कन्नड व इंग्रजीतून नावे न देता मराठी भाषेतूनही नावे द्यावीत व मतदारयादी मराठी भाषेतून उपलब्ध करून द्यावी त्यामुळे मराठी भाषिकांची सोय होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी मानकर यांनी तुम्ही उशिरा मागणी केला आहात तरीही याबाबत निवडणूक विभागाला माहिती देऊन मराठीतूनही माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. यावेळी खानापूर समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, रमेश धबाले, मुकुंद पाटील, अभिजित सरदेसाई, संदेश कोडचवाडकर आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article