महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आगीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये..!

03:30 PM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रविवारी दिवसभरात सहा ठिकाणी आगीच्या घटना : सरकारने आग दक्षता समिती नेमण्याची आवश्यकता

Advertisement

पणजी : गेल्या वर्षी डोंगराला आग लागून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपदेची हानी झाली होती. यावर्षी हल्लीच पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला आहे. असे असले तरी उकाडा असह्या आहे. त्यातच आता आगीच्या घटना ऐन थंडीच्या दिवसात घडू लागल्याने पर्यावरणाचे किंबहुना वनक्षेत्राचे मोठे नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने वेळीच आग दक्षता समिती नेमण्याची गरज आहे. काल रविवारी  दिवसभरात पाच ठिकाणी आगीच्या घटना घडलेल्या आहेत. हळदोणे, बोर्डे डिचोली येथे दोन ठिकाणी, करमळी तिसवाडी, सावर्डे व खांडोळा-माशेल या भागात काल किरकोळ आगीच्या घटना घडल्या. हळदोणे येथील आरोग्य केंद्राजवळील सुक्या गवताला आग लागली. बोर्डे डिचोली येथील व्ही. डी. घावकर यांच्या शेजारील गवताला आग लागली. करमळी येथील ]िवल्शा हॉटेलजवळ आग लागली. सावर्डे येथील आंबेउदक या ठिकाणी सुक्या गवताला आग लागली. खांडोळा माशेल येथील सरकारी महाविद्यालयाच्या परिसरातही सुक्या गवताला आग लागली. या सर्व घटनांत मोठ्या प्रमाणात हानी झाली नसली तरी परिसरातील नैसर्गिक संपदेला झळ बसली आहे.

Advertisement

अग्निशामक दलाला 16 कॉल्स

अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन या आगीवर नियंत्रण आणले. अन्यथा अनुचित प्रकार घडला असता. एकाच दिवसात अग्निशामक आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या राज्यातील विविध केंद्रांवर 16 कॉल्स आल्याची नोंद आहे. विविध घटनांमध्ये सुमारे तिघा जणांचा जीव वाचविण्यात दलाच्या जवानांना यश आले आहे, तर हजारो ऊपयांची मालमत्ता वाचवली आहे.

आतापासूनच उपाययोजनेची गरज

गतवर्षी डोंगराला आग लागल्यानंतर सुरूवातीला फारसे महत्त्व दिले गेले नाही. त्यानंतर मात्र डोंगरात आगडोंब उसळल्यानंतर आगीवर नियंत्रण आणताना वनखाते व अग्निशामक दल यांनी सामूहिक प्रयत्न करून आग विझविण्याचा प्रयत्न केला होता. अशाच पद्धतीने यंदाही आगीच्या घटना घडू नयेत यासाठी सरकारने आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. आगीच्या घटना घडल्यानंतर तत्पर सेवेला महत्त्व देणारे अग्निशामक दलाचे अधिकारी व जवान यांची धावपळ होते. त्यांच्या जिगरबाज प्रयत्नांमुळे अनेकांचे जीव वाचलेले आहेत. शिवाय मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात संरक्षण झालेले आहे.  तरीही या खात्यावरच पूर्णपणे अवलंबून न राहता सरकारने आग दक्षता समिती नियुक्त करून संभाव्य आगीच्या घटनेवर काय उपाययोजना करता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

गेल्या 15 दिवसांचा घटनाक्रम

अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाने 26 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या 15 दिवसांच्या विविध घटनांमध्ये सुमारे 34 लाख ऊपयांची मालमत्ता वाचविली आहे. या काळात 7 लाख 40 हजार ऊपयांच्या मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. 15 दिवसांच्या काळात अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या विविध केंद्रांत विविध ठिकाणांहून 153 कॉल आल्याची नोंद आहे.

शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कामत यांची सूचना...

संभाव्य आगीच्या घटना घडण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कामत यांनी हल्लीच राज्य सरकार व वनखाते यांना सूचना करून दखल घेण्याबाबत कळवले होते. परंतु सरकार व वनखात्याने याची अजूनही फारशी दखल घेतलेली नाही. सरकारने संभाव्य आगीच्या घटनांचा धोका ओळखून कामत यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अन्यथा वनक्षेत्राचे व वन्यजीवांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article