For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

म. फुले रोडवर चेंबर खचल्याने अपघातांच्या घटना

10:27 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
म  फुले रोडवर चेंबर खचल्याने अपघातांच्या घटना

बेळगाव : महात्मा फुले रोड, शहापूर येथे रस्त्यामधील चेंबर खचल्याने अनेक अपघात घडत आहेत. बँक ऑफ इंडिया कॉर्नरपासून भरधाव येणारी वाहने या चेंबरवरुन जात असल्याने दुचाकीचे अपघात होत आहे. मागील चार दिवसांत पाच ते सहा जण अपघाताने जायबंदी झाले असून या चेंबरची दुरुस्ती करण्याची मागणी रहिवाशांमधून केली जात आहे. महात्मा फुले रोडवरील ब्ल्यु रे हॉटेलनजीक चेंबर खचला आहे. चेंबर खचल्यामुळे रस्त्यापासून काही अंतर खाली गेला आहे. यामुळे वेगाने येणारी वाहने या चेंबरमध्ये अडकली जात असून अपघाताला निमंत्रण देत आहेत. या रस्त्यावरुन दररोज शेकडो वाहनांची ये-जा असते. विशेषत: रात्रीच्यावेळी खचलेला चेंबर दृष्टिस न पडल्याने अपघात होत आहेत. मंगळवारी सकाळी दुचाकीचालकाला या ठिकाणी अपघात झाल्याने स्थानिकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघात रोखण्यासाठी स्थानिकांनी चेंबरभोवती दगड लावले आहेत. अपघाताचे प्रकार वारंवार घडत असून चेंबरची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.