For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘झुआरी’चे शुक्रवारी उद्घाटन, पर्वरीत पायाभरणी

01:10 PM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘झुआरी’चे शुक्रवारी उद्घाटन  पर्वरीत पायाभरणी
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : राज्यस्तरीय मुक्तिदिन सोहळा उत्साहात,वैशिष्ट्यापूर्ण योगदानासाठी पुरस्कार प्रदान

Advertisement

पणजी : स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना 26 जानेवारीपर्यंत सरकारी नोकऱ्या देण्यात येतील. कुळांच्या जमिनीचे प्रश्नही लवकरच सोडवण्यात येतील. तसेच पर्वरी येथील 641 कोटी खर्चाच्या उ•ाणपुलाची येत्या 22 डिसेंबर रोजी पायाभरणी करण्यात येणार असून त्याच दिवशी झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटनही होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंगळवारी ताळगाव येथे आयोजित मुक्तीदिन कार्यक्रमात बोलताना सांगितले. मंत्री बाबूश मोन्सेरात, राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सरकारकडून स्वातंत्र्यसैनिकांचा मान

Advertisement

राज्य सरकारने नेहमीच स्वातंत्र्यसैनिकांचा मान राखलेला आहे. त्यांचे प्रलंबित सर्वच प्रश्न सरकारकडून सोडवण्यात येत आहेत. स्वातंत्र्यसैनिकांच्या अनेक मुलांना याआधी सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. 26 जानेवारीपर्यंत जे शिल्लक आहेत त्यांनाही नोकऱ्या देण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कुळांबाबतही लवकरच निर्णय

गोव्याला स्वातंत्र्य मिळून 62 वर्षे होऊनही कूळ आणि मुंडकारांच्या जमिनींचे प्रश्न तसेच आहेत. त्यामुळे सरकारने मुंडकारांच्या नावावर ते राहत असलेल्या घरांच्या जमिनी करण्यास सुऊवात केलेली आहे. लवकरच कुळांच्या जमिनीबाबतही निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

विकासासाठी सरकार कटिबद्ध

गोव्याचा विकास साधण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठीच स्वयंपूर्ण गोवा मोहीम राबवण्यात आली आहे. या योजनेद्वारे महिला, युवांसह सर्वांचाच विकास साधण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. त्यासाठी स्वयंपूर्ण मित्रांची मदत घेण्यात येत आहे.

विश्वकर्मा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 20 हजारांपेक्षा अधिक जणांनी योजनेत नोंदणी केलेली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. झुआरी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाची दुसरी लेन येत्या 22 डिसेंबरला खुली करण्यात येणार आहे. त्याच दिवशी तेथील 270 कोटींचे रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आणि पर्वरी येथील 641 खर्चाच्या उ•ाणपुलाची पायाभरणीही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

2050 पूर्वी गोवा 100 टक्के कार्बन उत्सर्जनमुक्त

गोव्यात वेगाने हरित ऊर्जेचा प्रसार होत आहे. सार्वजनिक बसगाड्यासुद्धा इलेक्ट्रॉनिक दिसून येत आहेत. विजेवरील अधिकाधिक वाहने खरेदी करण्यासही प्रोत्साहन देणारे गोव्याचे धोरण आहे. यामुळे 2050 पूर्वी गोवा पूर्णपणे कार्बन उत्सर्जनमुक्त होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी केला. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने गोव्यात 40 हजार रोजगाराच्या संधींची निर्मिती होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच गोव्याचे दरडोई उत्पन्न 30 टक्क्यांनी वाढल्याचे सावंत यांनी नमूद केले आहे.

विविध पुरस्कारांचे वितरण

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील पुरस्कारांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते वितरण करण्यात आले. त्यात पोलीस खात्यातील महासंचालक जसपाल सिंग, उत्तर गोवा अधीक्षक निधीन वाल्सन, संतोष देसाई, हरिश्चंद्र मडकईकर, विजयनाथ कवळेकर, गुऊदास कदम, निलेश राणे, परेश नाईक, नीळकंठ एकावडे, जितेंद्र फळदेसाई, नितीन गावकर, सुशांत सावंत यांचा, तर अग्निशामक दलातील शिवराम नाईक, विष्णू गावस, नीलेश पागी यांचा समावेश होता. होमगार्डमधून ज्ञानेश्वर तुळस्कर, सिंथिया रॉड्रिग्स यांचा तर कला आणि संस्कृतीमधून अशोक परब यांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट स्वयंपूर्ण मित्र म्हणून आशा वायंगणकर, विनायक च्यारी, सागर गावडे, सतीश वाघोणकर, आग्नेल डिसोझा माशादो, मिनेश तार यांचा सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट समाजसेवक म्हणून जॉन आगियार, सुभाष पार्सेकर, भवानेश्वर फातर्पेकर, वल्लभ साळकर, डॉ. अशोक प्रियोळकर, राहुल गावकर, सय्यद इक्बाल, प्रतीक वस्त, अशोक नाईक, सोयरू कोमरपंत, मुकेश सगलानी, आग्नेल मास्कारेन्हास यांना गौरवण्यात आले. हेमंत सामंत यांना ’कृषी रत्न’, महेश राणे आणि महेश गावकर यांना ‘कृषीfिवभूषण’, दयानंद फळदेसाई यांना कृषी भूषण, तर आमोणा येथील कृष्णा सिनारी गावकर यांना फा. इनासियो आल्मेदा पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

पत्रकार, छायाचित्रकारांकडून संताप व्यक्त

या मुक्ती दिन सोहळ्dयात पत्रकार तसेच छायाचित्रकार यांना व्यासपीठापासून लांब कुठेतरी कोपऱ्यात जागा देण्यात आली म्हणून त्यांनी संताप व्यक्त कऊन हा प्रकार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कानी घातला. तेव्हा त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आणि जाब विचारला. ज्या ठिकाणी जागा देण्यात आली होती तेथून वार्तांकन करणे व फोटो काढणे शक्य नव्हते. एवढा मोठा सोहळा साजरा करताना पत्रकारांना, छायाचित्रकारांना योग्य व चांगली जागा देण्याचे भान ठेवायला हवे होते, असे सावंत यांनी संबंधितांना सुनावले. सुरक्षा पास देण्यात आले होते त्याचाही काही उपयोग झाला नाही, असेही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून गोमंतकीयांना शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गोवा मुक्तीदिनानिमित्त गोमंतकीय जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा मुक्तीसाठी ज्यांनी लढा दिला त्यांचे स्मरण कऊन गोव्याच्या भरभराटीसाठी जनतेने हातभार लावावा, असे त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी गोवा मुक्तीसाठी प्राण दिले त्यांना मुर्मू यांनी सलाम केला आहे. गोवा मुक्तीचा स्मरण करण्याचा हा दिवस असून तो जनतेला सतत स्फुरण देत राहील, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. गोवामुक्ती लढा गोव्याच्या भरभराटीसाठी सतत प्रेरणा देत राहतो असे नरेंद्र मोदी यांनी नमूद केले तर गोव्याचे स्वातंत्र्य, संस्कृती, वारसा अबाधित राहो, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.