उचगावात विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
वार्ताहर/उचगाव
उचगावमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून ग्राम पंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे होत्या. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उचगाव शिक्षक आणि विद्यार्थी संघटनेकडूनही स्पर्धा भरवून त्यांच्या कलागुणांना वाव देत असल्याचे तेरसे यांनी आपल्या भाषणात नमूद केले. या समारंभाला मुख्याध्यापक प्रकाश चलवेटकर, वाय. बी चौगुले, सुहास जाधव उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक पी. एल. सोमनाथ यांनी केले. यावेळी या स्पर्धेमध्ये कुद्रेमनी हायस्कूल कुद्रेमनी, मळेकरणी हायस्कूल उचगाव, रामलिंग हायस्कूल तुरमुरी, स्वामी विवेकानंद हायस्कूल उचगाव, नागनाथ हायस्कूल बेकिनकेरे, सातेरीदेवी माध्यमिक विद्यालय अतिवाड या हायस्कूलने मर्यादित स्पर्धांचे आयोजन केले होते.