महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आ . वैभव नाईकांच्या कुडाळातील प्रचार कार्यालयाचे उदघाटन

04:14 PM Nov 09, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

माजी खासदार विनायक यांच्या हस्ते उदघाटन

Advertisement

वार्ताहर/ कुडाळ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे व महाविकास आघाडीचे कुडाळ - मालवण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन शनिवारी कुडाळ येथील शिवसेना (उबाठा) शाखा येथे ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखेजवळ महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांचे प्रचार कार्यालय करण्यात आले आहे. या प्रचार कार्यालयाचे उदघाटन आज माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते फित कापून व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी पदाधिकारी- कार्यकर्त्यानी फटाक्याची माळ लावून व जोरदार घोषणाबाजी केली. 'महाविकास आघाडीचा विजय असो', 'आमदार वैभव नाईक आगे बढो हम तुम्हारे साथ है' आदी घोषणाबाजी करीत सारा परिसर दणाणून सोडला.महाविकास आघाडीची पदाधिकारी-कार्यकर्त्यानी मोठी गर्दी केली होती.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख राजन नाईक, उप तालुका प्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, नागेंद्र परब, अतुल बंगे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला जिल्हा संघटक श्रेया परब, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे भास्कर परब, विद्याप्रसाद बांदेकर, युवक विधानसभा अध्यक्ष मंदार चंद्रकांत शिरसाट, विभागप्रमुख दीपक आंगणे, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे, सई काळप, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, सचिन काळप, महिला आघाडी तालुका संघटक स्नेहा दळवी व मथुरा राऊळ, बाळा कोरगांवकर, सचिन कदम, संतोष शिरसाट आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते

Advertisement

Advertisement
Tags :
#TARUN BHARAT SINDHUDURG # NEWS UPDATE # KONKAN UPDATE # SINDHUDURG NEWS
Next Article