आमशी येथे क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम अभियानचे उद्घाटन
सांगरुळ प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून सुरू असलेली क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम अभियान यशस्वीपणे राबवा असे आवाहन करवीर चे आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने यांनी केले आहे .आमशी तालुका करवीर येथे आरोग्य विभाग, पंचायत समिती, करवीर व प्राथमिक आरोग्य केंद्र सांगरूळ यांच्या वतीने संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियानच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते .
यावेळी बोलताना डॉक्टर मदने यांनी क्षयरोग व कुष्ठरोगाच्या लक्षणे व त्यावरील उपचार याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी सर्व्हे दरम्यान घरोघरी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशाताई व स्वयंसेवक यांच्याकडून तपासणी करून घेऊन आरोग्य विभागास सहकार्य करावे असे आवाहन केले .यावेळी बोलताना सांगरुळ प्राथमिक केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ शुभम जाधव यांनी आरोग्य विभागाकडून क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम अभियान २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२३ अखेर राबवले जाणार असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी सांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले.
डॉ मदने यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना आभा व गोल्डन कार्ड विषयी माहिती दिली व आभा व गोल्डन कार्ड काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.सदर कॅम्प वेळी ३४ आभा कार्ड व १०० गोल्डन कार्ड काढण्यात आले.यावेळी आरोग्य विस्तार अधिकारी श्रीम. अनिता चव्हाण, आरोग्य सेवक आसिफ पठाण प्राथमिक आरोग्य केंद्र सांगरूळचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम जाधव,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सरिका फेगडे, आनंदा बाटे, महेश काटकर, आरोग्य सेविका श्रीम. माधुरी काशिद, श्रीम. सुप्रिया सावंत, गटप्रवर्तक श्रीम. बाटे , आशाताई, मदतनीस व आमशी ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत श्रीम. माधुरी काशिद यांनी केले. व आरोग्य सेवक रवि कोळी यांनी आभार मानले.