महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नवव्या रायसीना डायलॉगचे 21 फेब्रुवारीला उद्घाटन

06:44 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्रीसचे पंतप्रधान असणार मुख्य अतिथी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21 फेब्रुवारी रोजी रायसीना डायलॉगच्या 9 व्या सत्राचे उद्घाटन करणार आहेत. 9 व्या रायसीना डायलॉगमध्ये मुख्य अतिथी म्हणून ग्रीसचे पंतप्रधान कायरियाकोस मित्सोताकिस सामील होणार आहेत. तसेच ते या उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहेत. रायसीना डायलॉगमध्ये जागतिक समुदायासमोर निर्माण झालेल्या प्रश्नांवर चर्चा होत असते. या संवादसत्रात अनेक दिग्गज नेते तसेच तज्ञ सामील होणार आहेत.

9वा रायसीना डायलॉग 21-23 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणानुसार ग्रीसचे पंतप्रधान कायरियाकोस मित्सोताकिस दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ग्रीसच्या पंतप्रधानांसोबत एक शिष्टमंडळही भारत दौऱ्यावर येणार आहे.

15 वर्षांमध्ये पहिल्यांदाच दौरा

ग्रीसच्या कुठल्याही नेत्याकडून 15 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताचा पहिला द्विपक्षीय दौरा होणार आहे. यापूर्वी 2008 मध्ये ग्रीसचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर आले होते. जानेवारी 2008 मध्ये ग्रीसचे पंतप्रधान कोस्टास करमनलिस यांच्यासोबत विदेशमंत्री डोरा बाकायोनिस देखील दौऱ्यावर आले होते.

द्विपक्षीय चर्चा होणार

ग्रीसचे पंतप्रधान मित्सोताकिस यांच्या भारत दौऱ्यामुळे दोन्ही देशांची भागीदारी आणखी मजबूत होणार आहे. पंतप्रधान मोदी हे ग्रीसच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसेच त्यांच्या सन्मानार्थ प्रीतिभोजनाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती विदेश मंत्रालयाने दिली आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article