महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लक्षद्वीपमध्ये 1,156 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन

06:42 AM Jan 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर : सागरी क्षेत्राचा विकास करण्याचे कार्य

Advertisement

वृत्तसंस्था/  लक्षद्वीप

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये 1,156 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पेले आहे. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळापर्यंत ज्या पक्षाचे सरकार राहिले, त्यांची प्राथमिकता केवळ स्वत:च्या पक्षाचा विकास करणे होती. परंतु आमच्या सरकारने सागरी क्षेत्राचा विकास आणि सीमाक्षेत्राचा विकास केला असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

आमच्या सरकारने हज यात्रेकरूंना सुविधा पुरविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा लाभ लक्षद्वीपच्या लोकांना झाला आहे. हज यात्रेकरूंसाठी व्हिसा नियम सुलभ करण्यात आले आहेत. हजशी निगडित बहुतांश कार्यवाही आता डिजिटल होत आहे. सरकारने महिलांना बिना महरम हज जाण्याची सूट दिली आहे. या सर्व प्रयत्नांमुळे उमराहसाठी जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

लक्षद्वीप भले छोटे असले तरी याचे मन अत्यंत मोठे आहे. येथे मिळत असलेले प्रेम आणि आशीर्वादामुळे मी भारावून गेलो आहे. मागील 10 वर्षांमध्ये आमच्या सरकारने सीमावर्ती भाग आणि सागरी भागांना प्राथमिकता दिली आहे. 2020 मध्ये मी लक्षद्वीपवासीयांना 1 हजार दिवसांच्या आत वेगवान इंटरनेटची सुविधा मिळेल अशी गॅरंटी दिली होती. आज कोच्ची-लक्षद्वीप सबमरीन ऑप्टिकल फायबर प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. आता लक्षद्वीपमध्ये 10 पट अधिक वेगाने इंटरनेट सुविधा मिळणार असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

जागति सागरी खाद्यबाजारात स्वत:ची हिस्सेदारी वाढविण्यावर भारत लक्ष केंद्रीत करत असून यामुळे लक्षद्वीपला मोठा लाभ होत आहे. लक्षद्वीपचा टुना मासा आता जपानला निर्यात होतोय आणि मच्छिमारांचे कल्याण पूर्णपणे सुनिश्चित केले जात आहे. लक्षद्वीपमध्ये सागरी शेवाळाच्या शेतीशी निगडित शक्यताही पडताळून पाहिल्या जात असल्याचे मोदी म्हणाले.

आमचे सरकार लक्षद्वीपच्या शाश्वत विकासासाठी प्रतिबद्ध आहे. येथील सौरऊर्जा प्रकल्प हे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमवर आधारित आहेत. लक्षद्वीपचा हा पहिला बॅटरी आधारित सौर प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या सागरी पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत होणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article