For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रभाताई सौहार्द सोसायटीचे 13 रोजी उद्घाटन

10:24 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
प्रभाताई सौहार्द सोसायटीचे 13 रोजी उद्घाटन
Advertisement

वडगावात होणार पहिली शाखा : स्वयंरोजगारासाठी करणार मदत

Advertisement

बेळगाव : सर्वसामान्य व बेरोजगारांना उद्योग निर्मितीसाठी आर्थिक पतपुरवठा व्हावा या दृष्टीने प्रभाताई सौहार्द सहकारी सोसायटीची स्थापना करण्यात येणार आहे. या सोसायटीचे उद्घाटन बुधवार दि. 13 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सोनार गल्ली, वडगाव येथे होणार आहे. प्रभाताई सौहार्द सहकारी सोसायटीची ही पहिली शाखा असून यापुढील काळात जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाखा सुरू होतील, अशी माहिती सोसायटीच्या अध्यक्षा व काँग्रेस नेत्या प्रभावती मास्तमर्डी यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आज अनेक तरुण स्वउद्योग सुरू करण्यास तयार आहेत. परंतु, त्यांना अर्थपुरवठा होत नसल्याने ते आपल्या स्वप्नांपासून दूर राहत आहेत. याबरोबरच महिला, विद्यार्थी यांना रोजगार मिळवून देण्यासाठी सोसायटी पतपुरवठा करणार आहे. सोसायटीच्या सभासदांना 1 लाख रुपयांचे विमा कवच प्रभाताई फाऊंडेशनतर्फे दिले जाणार आहे. दरवर्षी या विम्याची रक्कम या फाऊंडेशनच्या माध्यमातून दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कुडलसंगम येथील पंचमसाली जगद्गुरु महापीठाचे बसवजय मृत्युंजय महास्वामी, हुबळी येथील जगद्गुरु शिवशंकर शिवाचार्य यांच्या दिव्य सानिध्यात उद्घाटन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला विधानसभाध्यक्ष यु. टी. खादर, सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, के. रंजण्णा, एस. सी. महादेवप्पा यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेवेळी उज्ज्वला कित्तूर, स्वाती पाटील, दीपा पट्टणशेट्टी, ए. बी. इनामदार यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.