For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

कुडाळ हॉटेल लाईम लाईट येथे चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

01:18 PM Dec 10, 2023 IST | अनुजा कुडतरकर
कुडाळ हॉटेल लाईम लाईट येथे चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

वर्षा आर्टस् या संस्थेच्यावतीने आयोजन ; 11 डिसेंबर सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रदर्शन पाहण्यासाठी खुले

Advertisement

कुडाळ -

वर्षा आर्टस् या संस्थेच्यावतीने कुडाळ येथील माने जी क्रिएशन ( हॉटेल लाईम लाईट ) येथे आयोजित चित्र प्रदर्शनाला उद्घाटन शनिवारी सायंकाळीं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या कल्पकतेने विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे कुडाळ तालुक्यातील या पहिल्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.11 डिसेंबर सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात 500 चित्रे मांडण्यात आली आहेत. तीन दिवसीय या प्रदर्शनाचे उद्घाटन जे . जे.स्कूल ऑफ आर्ट ( कुडाळ) चे सुधीर जड्ये यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व श्री सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल ( बांदा )चे माजी प्राचार्य लक्ष्मण पावसकर यांच्या उपस्थिती होती. व्यासपीठावर हॉटेल लाईम लाईट चे मालक प्रदीप माने , कमलाकर गावडे,नारायण ( नाना ) राऊळ , पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य केशव पिंगुळकर, मधुकर गावडे, वर्षा आर्टसच्या संचालिका वर्षा मनोहर गावडे ,महेश गावडे उपस्थित उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत व सत्कार मनोहर गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.

Advertisement

चित्रकलेला प्राचीन काळापासून प्राधान्य दिले गेले.राजेशाही काळात या कलेला राजाश्रय मिळाला होता. कला ही जीवनाला आनंद देणारी असते. विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण असतात. त्यांना दिशा देण्याचे काम पालकांनी केले पाहिजे ,असे मान्यवरांनी सांगून विद्यार्थांच्या कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या वर्षा आर्ट्सच्या या उपक्रमाचे आणि या आर्टसच्या संचालिका वर्षा गावडे यांचे कौतुक केले. सुधीर जड्ये,लक्ष्मण पावसकर, प्रदीप माने ,नारायण राऊळ , दत्ता पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. वर्षा गावडे यांनी पालक व विद्यार्थांच्या चांगल्या सहकार्यामुळे आपण हे चित्र प्रदर्शन यशस्वी करू शकल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले. चित्रकला स्पर्धामध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
वसंत गावडे,राजाराम गावडे , गोविंद ( बबन ) वेंगुर्लेकर ,नीलेश गावडे ,विजय दळवी,संतोष गावडे तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन राजा सामंत यानी केले.

Advertisement

Advertisement
×

.