For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पारवाड ग्रामपंचायतीचे लोकार्पण

11:37 AM May 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
पारवाड ग्रामपंचायतीचे लोकार्पण
Advertisement

नूतन इमारतीचे मंत्री हेब्बाळकरांच्या हस्ते उद्घाटन : महिला सक्षमीकरण करून खेड्यापाड्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध

Advertisement

वार्ताहर/कणकुंबी

महिलांसाठी ज्या योजना सरकारने सुरू केल्या आहेत. त्याचा प्रत्येक महिलेला लाभ झाला पाहिजे. कारण कुटुंबाची अधिक जबाबदारी महिलांच्यावर असते, महिला व्यवस्थित कुटुंब चालवतात, आर्थिक नियोजन करतात, बचत करतात. या सगळ्dया गोष्टींमध्ये महिला तरबेज आहेत. महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. महिला सक्षमीकरण करून खेड्यापाड्याचा विकास करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उद्घाटनप्रसंगी केले.  पारवाड येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष भिकाजी गावडे होते. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, माजी आमदार अरविंद पाटील, माजी जि. पं. सदस्य विलास बेळगावकर, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मेस्त्राr तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, सरकारच्या योजनांची माहिती जनतेला मिळावी यासाठी पंचायतीने संगणकीय फलक लावावा. रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्व लोकांना रोजगार संधी उपलब्ध करून द्यावा, पंचायतीकडून जी कामे होत नाहीत ती कामे करण्यासाठी आमदार, खासदार असतात असे सांगितले. पारवाड ग्रामपंचायतीच्या विविध फंडातून जवळपास 87 लाख रुपये खर्च करून पंचायतीची नवीन प्रशस्त अशी इमारत उभारली आहे. सदर इमारतीचे लोकार्पण बुधवारी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते केले. यावेळी ग्राम पंचायतीतर्फे उपस्थितांचे स्वागत केले. व्यासपीठावर पारवाड पीडीओ विरेश सज्जन, उपाध्यक्षा सीता सुतार, सदस्य सुनील पवार, बाबाजी पाटील, सदस्या प्रियांका गावकर, सत्यवती हरिजन, पार्वती हरिजन, सुलोचना नाईक, ता. पं. च्या योजना अधिकारी गंगा मॅडम, गोल्याळी ग्राम पंचायत अध्यक्ष नामदेव गुरव व इतर उपस्थित होते. यावेळी पंचायतीच्यावतीने अनेकांचा सत्कार केला. कार्यक्रमाला पारवाड ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील नागरिक, पीडीआ व इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार सुनील चिगुळकर यांनी केले. विरेश सज्जन यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.