महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माता-शिशू रुग्णालयाचे उद्या उद्घाटन

10:56 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, अंजली निंबाळकरांची उपस्थिती

Advertisement

खानापूर : खानापूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या माता-शिशू रुग्णालयाच्या उद्घाटनास अखेर मुहूर्त मिळाला असून बुधवार दि. 11 रोजी दुपारी 1 वाजता आरोग्य मंत्री दिनेश गुंडुराव, पालकमंत्री सतिश जारकीहोळी, महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, अशोक पट्टण, प्रकाश हुक्केरी, भरतगौडा कागे, खासदार जगदीश शेट्टर, खासदार विश्वेश्वर हेगडे, खासदार प्रियांका जारकीहोळीसह जिल्ह्यातील आमदारांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठल हलगेकर राहणार आहेत. तर काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव अंजली निंबाळकरही उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय आरोग्य मिशन उपक्रमात मंजूर झालेले 60 खाटांचे माता-शिशू रुग्णालय बांधून 1 वर्ष पूर्ण झाले होते. मात्र या रुग्णालयाचे उद्घाटन या ना त्या कारणाने लांबले होते. जुलै महिन्यात उद्घाटनाची तारीख निश्चित केली होती. मात्र विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे निमित्त करून उद्घाटन सोहळा पुन्हा लांबणीवर टाकण्यात आला होता. अखेर बुधवार दि. 11 रोजी या रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहे. या रुग्णालयात माता आणि शिशूंसाठी 60 खाटांची व्यवस्था करण्यात आली असून यात डायलिसिसची सोय करण्यात आली आहे. डायलिसिसची उपकरणेही दाखल झाली असून बुधवारी या सेवेचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.

परिसरातील रुग्णांची चांगली सोय होणार

सध्या अस्तित्वात असलेल्या तालुका वैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीसाठी 35 कोटीचा निधी मंजूर झाला असून या दवाखान्याच्या बांधकामास लवकरच सुरवात होणार आहे. सध्या असलेला दवाखाना पाडवून त्या ठिकाणी नवी इमारत उभारण्यात येणार आहे. नवी इमारत उभारणी होईपर्यंत हा दवाखाना शिशू-माता रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. नवीन शंभर खाटांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सर्व सोयी दवाखान्यात सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे खानापूर परिसरातील रुग्णांची चांगलीच सोय होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article