For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माडानी पर्रात कम्युनिटी पार्कचे उद्घाटन

12:38 PM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
माडानी पर्रात कम्युनिटी पार्कचे उद्घाटन
Advertisement

आमदार मायकल लोबो यांचा पुढाकार

Advertisement

म्हापसा : गोव्याबरोबरच देशाच्या पर्यटन नकाशावर नाव कोरलेल्या पर्रा माडानी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या कम्युनिटी पार्कचे रितसर उद्घाटन आमदार मायकल लोबो, शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, सरपंच चंदानंद हरमलकर, उपसरपंच डॅनिअल लोबो व सेंट अॅनी चर्चचे पेरीश प्रिस्ट फादर पीटर गामा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी फ्रँकी व्हिएगस, अमोल नावेलकर, प्रा. प्रदीप मोरजकर, सिद्धार्थ केरकर, शारदा केरकर, जॉयस डिसोझा, अॅटर्नी बेनेडिक डिसोझा उपस्थित होते.

पर्रा गाव अतिसुंदर असून येथे देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली. यापूर्वी येथे येणाऱ्या पर्यटकांची शौचालयाअभावी गैरसोय होती ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे लोबो म्हणाले. पावसाळ्यानंतर येथे लहान मुलांसाठी अत्याधुनिक पद्धतीचे गार्डन उभारणार असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच चंदानंद हरमलकर, उपसरपंच डॅनिअल लोबो यांचीही भाषणे झाली. पर्रा गावात माडानी प्रसिद्ध असून येथे हजारो पर्यटक येतात त्यांच्या सोयीसाठी सर्व सुविधा पर्रा पंचायत उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. प्रदीप मोरजकर, आभार आमदार डिलायला लोबो यांनी मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.