महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लिव्हर क्लिनिक-गॅस्ट्रोएंट्रोलॉजीचे सेंट्रा केअर हॉस्पिटलमध्ये उद्घाटन

11:22 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेंट्रा केअर हॉस्पिटलमध्ये बेळगावच्या दक्षिण भागातील एकमेव सुविधा केंद्र

Advertisement

बेळगाव : टिळकवाडी येथील सेंट्रा केअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लिव्हर क्लिनिक व गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि एंडोस्कोपी विभागाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून रोहिणी गोगटे व डॉ. सुनील शेणवी उपस्थित होते. अत्याधुनिक उपकरणे आणि कौशल्यप्राप्त कर्मचारी यांच्यासह गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभाग सुरू करण्यात आला आहे. बेळगावच्या दक्षिण भागातील हा एकमेव विभाग आहे. लिव्हर क्लिनिकचे नेतृत्त्व प्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्ट व प्रत्यारोपण सर्जन डॉ. सुनील शेणवी करणार आहेत. यामध्ये डॉ. श्रीशैल हंगडी, डॉ. आनंद तोलगी, डॉ. रोहित जोशी यांचा समावेश तज्ञ टिममध्ये असणार आहे. अन्ननलिका, स्वादुपिंड, यकृत, मूत्राशय, गॅस्ट्रोएंट्रॉलाजिस्ट कॅन्सर, काविळ अशा जटिल प्रक्रिया आणि शस्त्रक्रिया आता सेंट्रा केअर हॉस्पिटलमध्ये केल्या जाणार आहेत.

Advertisement

सेंट्रा केअर हॉस्पिटलचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी स्वागत केले. मधुमेह तज्ञ डॉ. नीता देशपांडे यासह वैद्यकीय संचालक व सेंट्रा केअरच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सुपरस्पेशालिटी विभागाच्या सोयींबाबत माहिती दिली. रोहिणी गोगटे यांनी बेळगावच्या नागरिकांसाठी आरोग्य सुविधा किती महत्त्वाच्या आहेत, याची माहिती दिली. तसेच हॉस्पिटलमधील अत्याधुनिक उपकरणे व सेवांबाबत कौतुकही केले. मुख्य न्युट्रिशियनिस्ट ममता यांनी डॉ. शेणवी यांचा परिचय करून दिला. डॉ. शेणवी यांनी लिव्हरचे आरोग्य तसेच खराब जीवनशैलीचा लिव्हरवर कसा परिणाम होतो, याची माहिती दिली. डॉ. आनंद सनकाळ यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. श्रीवत्स यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article