For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केएलईच्या जिरगे सभागृहाचे नूतनीकरणानंतर उद्घाटन

10:28 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
केएलईच्या जिरगे सभागृहाचे नूतनीकरणानंतर उद्घाटन
Advertisement

1200 आसनक्षमतेचे वातानुकूलित सभागृह

Advertisement

बेळगाव : बेळगावच्या सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात महत्त्वाचे योगदान असलेल्या केएलईच्या डॉ. बी. एस. जिरगे सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यशाळा, चर्चासत्रे याबरोबरच नाटक व इतर सांस्कृतिक कार्यक्रम होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक सभागृहाचे बांधकाम करण्यात आल्याची माहिती केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली. डॉ. बी. एस. जिरगे सभागृहाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. एकूण 1200 आसनक्षमता असणारे हे सभागृह वातानुकूलित आहे. आयईए तंत्रज्ञानाचा वापर करून स्क्रीनसह अत्याधुनिक साऊंडचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 1982 मध्ये या सभागृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता या सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. हुबळी येथेही सुसज्ज असे 1000 खाटांचे रुग्णालय बांधले जात असून लवकरच त्याचा उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केएलईच्या शताब्दी सभागृहात बी. एस. जिरगे सभागृहासह 600 आसनांचा डॉ. एच. बी. राजशेखर हॉल, 300 आसनांचा डॉ. बी. एस. कोडकिणी हॉल व 150 आसनांचा डॉ. व्ही. डी. पाटील हॉल कार्यरत आहे. यामध्ये अनेक सांस्कृतिक, साहित्यिक व इतर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आल्याचे डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले. यावेळी मुंबई येथील इंटेरिअर डिझायनर सोनिया पोतदार व इंटेरिअर कॉन्ट्रॅक्टर संजीव बंगेरा यांचा डॉ. एच. बी. राजशेखर व डॉ. नितीन गंगाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या निमित्ताने केएलईच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी डॉ. एम. एन. गणाचारी, डॉ. अविनाश कवी यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.