महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जगन्नाथ मंदीर कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन

06:37 AM Jan 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / जगन्नाथ पुरी

Advertisement

जगन्नाथ पुरी येथील भगवान जगन्नाथाच्या मंदिराभोवतीच्या कॉरीडॉ प्रकल्पाचे उद्घाटन ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केले आहे. या कॉरिडॉर प्रकल्पासाठी 800 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. या कॉरिडॉरचा उद्देश जगन्नाथ पुरीच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक सुविधा देण्याचा आहे. यामुळे या मंदिराच्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

Advertisement

बुधवारी या ‘श्रीमंदीर परिक्रमा प्रकल्प’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भव्य प्रकल्पाचे अधिकृतरित्या उद्घाटन करण्यात आले. ते पुरीच्या गजपती महाराजा दिव्यसिंग देब आणि ओडीशातील 90 महत्वाच्या मंदिरांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले. देशातील अनेक मंदिरांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या कॉरिडॉर प्रकल्पात प्रशस्त पार्किंग जागा, नवा सेतू, परिक्रमेसाठी रुंद मार्ग, निवासी कक्ष, सुरक्षा कक्ष, स्वच्छता गृहे आणि इतर सोयी सुविधांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांची परीक्रमा

उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी पादत्राणे न घालता भगवान जगन्नाथाच्या मंदिराची परिक्रमा केली. त्याच्या समवेत प्रमुख अतिथींनीही परिक्रमा केली. या कार्यक्रमासाठी जगन्नाथपुरी शहर सुशोभित करण्यात आले होते. तसेच मंदीर परिसरही शानदाररित्या सजविण्यात आला होता.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article