For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेब्बाळकर स्किन अॅण्ड हेअर क्लिनिकचे उद्घाटन

12:38 PM Nov 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
हेब्बाळकर स्किन अॅण्ड हेअर क्लिनिकचे उद्घाटन
Advertisement

बेळगाव : डॉ. हिता हेब्बाळकर यांच्या हेब्बाळकर स्किन अॅण्ड हेअर क्लिनिकचे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हे क्लिनिक कॉलेज रोडवरील हॉटेल सन्मानच्या मागील बाजूस दासप्पा शानभाग यांच्या एम्पायरमध्ये सुरू करण्यात आले आहे. याचा उद्घाटन सोहळा रविवारी सायंकाळी पार पडला. यावेळी मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, डॉ. हिता यांनी कठोर मेहनत घेतली असून अत्याधुनिक यंत्रोपकरणे क्लिनिकमध्ये कार्यान्वित केली आहेत. त्यांचे हे नवे क्लिनिक बेळगाव व उत्तर कर्नाटकातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी कार्यरत राहणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, मृणाल हेब्बाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.