महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दिवाळी धमाका प्रदर्शनाचे ज्ञान प्रबोधन मंदिरमध्ये उद्घाटन

10:38 AM Nov 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : ज्ञान प्रबोधन मंदिर विद्यालयात ‘प्रबोधन दिवाळी धमाका’ या दीपावली सणानिमित्त आयोजित प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हेमेंद्र पोरवाल म्हणाले, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरील ज्ञान व अनुभव मिळतात. संवाद कौशल्य, विक्री कौशल्य तसेच जमा-खर्च यांचा ताळमेळ याबद्दलचे ज्ञान मिळते. पुढील जीवनात शालेय शिक्षणातील असे अनुभव मार्गदर्शक ठरतात, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. प्राथमिक विभाग प्रमुख शिक्षिका प्रतिभा जवळकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रशासक डॉ. गोविंद वेलिंग, प्राचार्या मंजिरी रानडे, संचालक अनिल चौधरी, नितीन कपिलेश्वरकर आदी उपस्थित होते. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी स्वत: बनविलेले आकाश कंदील, रंगीत पणत्या, भेटकार्ड, खाद्यपदार्थ व खेळण्यांचे स्टॉल्स मांडण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article