तुरमुरी येथील बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन
वार्ताहर/उचगाव
तुरमुरी येथील शेतकरी संघटना आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बैलगाडी शर्यतीचे आयोजीत उद्घाटन मोट्या उत्साहात करण्यात आले. तुरमुरी येथील शेतकरी संघटना आणि ग्रामस्थच्या वतीने आयोजित बैलगाडी शर्यती, म्हैस पळविण्याच्या शर्यती हे सर्व करमणुकीचे कार्यक्रम खरंतर शेतकऱ्यांचा एक विरंगुळा दूर व्हावा आणि शेतीविषयी त्यांच्यामध्ये आवड निर्माण होऊन शेतीत भरघोस पिके काढण्यासाठी त्यांना एक नवीन प्रेरणा मिळावी यासाठीच या बैलगाडी शर्यतींचा शोध लागत गेला. शेतकरी संघटित होऊन शेती बरोबरच सामाजिक कार्य करावे. शेतकऱ्यांनी एकत्र यावे. भरघोस पिके काढावीत. आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या सोबत सातत्याने ज्यांची शेतीसाठी साथ मिळते त्या जनावरांचीही योग्यप्रकारे निगा राखावी, असे आवाहन तुरमुरी ग्रा.पं. माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते नागनाथ जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी गणेश फोटो पूजन परशराम अष्टेकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज फोटोचे पूजन आप्पाण्णा खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन यल्लाप्पा बेळगुदकर, नारायण मेघोचे, मल्लाप्पा तंगणकर, पुन्हाप्पा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर बैलगाडीचे पूजन व श्रीफळ वाढवून शुभारंभ देवाप्पा मेघोचे, ज्ञानेश्वर बेळगुदकर, भरमा कलभंट, नामदेव मेघोचे, गणपत कालभंट, नारायण तंगणकर, देवाप्पा तंगणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यालाप्पा तंगानगर, यल्लाप्पा जाधव, परशराम बेळगावकर, संतोष बांडगे, भैरू कलभंट, राजू गडकरी उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून रामलिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश चलवेटकर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत बाबू बेळगावकर यांनी केले. सदर शर्यत रविवार दि. 17 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.