अम्युजमेंट रोबोटिक बटरफ्लाय-अॅनिमल्स प्रदर्शनाचे उद्घाटन
बेळगाव : अम्युजमेंट रोबोटिक बटरफ्लाय व अॅनिमल प्रदर्शन म्हणजे मनोरंजनाचा एक खजिना आहे. सायमन एक्झिब्युटर्स यांनी कर्नाटकाच्या विविध भागात यशस्वीरीत्या प्रदर्शन भरवून आता बेळगावकरांच्या भेटीला हे प्रदर्शन आणले आहे. तणावग्रस्त जीवनामध्ये माणसाला आनंदात वेळ घालविण्यासाठी अशी प्रदर्शने उपयोगी ठरतात. बेळगावकर अशा प्रदर्शनांना उत्तम प्रतिसाद देतील, असा विश्वास रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार यांनी व्यक्त केला. सीपीएड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या अम्युजमेंट रोबोटिक बटरफ्लाय व अॅनिमल प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी अविनाश पोतदार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुरकुंबी शुगर्सच्या विद्या मुरकुंबी उपस्थित होत्या. सायमन एक्झिब्युटर्सचे संचालक नागचंद्रा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कर्नाटकातील विविध शहरात आम्ही प्रदर्शने आयोजित केली असून बेळगावमधील हे पहिलेच प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात फुलपाखरांचे व प्राण्यांचे देखावे सादर करण्यात आले आहेत.
कर्नाटकाची स्थापना होऊन 50 वर्षे पूर्ण झाली, याचे औचित्य साधून राज्यभरात ‘कर्नाटका संभ्रम-50’ प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे, असे सांगितले. प्रदर्शनात कर्नाटकातील मुख्यमंत्री, सिनेकलाकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, साहित्यिक, खेळाडू यांची छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. कर्नाटका संभ्रमाची सुरुवात बेळगावमधून करत असल्याचे नागचंद्रा यांनी सांगितले. या प्रदर्शनात रोबोटिक बटरफ्लाय शो होत असून ते बेळगावकरांसाठी खास आकर्षण आहे. याबरोबरच रोबोटिक अॅनिमल किंगडम पार्क, सिंगापूर टॉवर्स, सेल्फी पार्क या अम्युजमेंट पार्कची व्यवस्था करण्यात आली आहे. खाद्यपदार्थांसोबतच या प्रदर्शनात गृहोपयोगी वस्तू, फॅन्सी साहित्य, जेवणाचे स्टॉल, लेदर प्रॉडक्ट, हँडवर्क असे विविध स्टॉल आहेत. बच्चे कंपनीचे मनोरंजन व्हावे, यासाठी विविध खेळ या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. सायंकाळी 5 ते 9.30 या वेळेत सीपीएड् मैदानावर अम्युजमेंट पार्क सुरू राहणार आहे. पुढील दीड महिना अम्युजमेंट पार्कचा आनंद नागरिकांना घेता येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी गणेश रे•ाr, आनंद अॅड्सचे अनंत लाड, यश कम्युनिकेशनचे प्रकाश कालकुंद्रीकर यासह इतर उपस्थित होते.