रॉयलओक फर्निचरच्या सुसज्ज शोरुमचे उद्घाटन
बेळगाव : बॉक्साईट रोड, कलमेश्वरनगर येथील नव्याने सुरू झालेल्या रॉयलओक या सुसज्ज फर्निचर शोरुमचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला. तब्बल 12 हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये घरासाठी लागणारे सर्व फर्निचर एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहे. जागतिक दर्जाची गुणवत्ता असलेल्या रॉयलओक या कंपनीचे कर्नाटकातील 63 वे शोरुम सुरू करण्यात आले असल्याने बेळगावच्या ग्राहकांना आता उत्तम दर्जाचे फर्निचर व गृहसजावटीचे साहित्य खरेदी करता येणार आहे. रॉयलओक इन्कॉर्पोरेशन प्रा. लि. चे चेअरमन विजय सुब्रमण्यम, व्यवस्थापकीय संचालक मंथन सुब्रमण्यम, उद्योजक अभयकुमार हरदी, एरिया हेड अरुण गौडा, व्ही. एम. सी. हेड तम्मय्या कोटरेजा, ऑफीस हेड महेश पंडित, कॅटेगरी हेड धनंजय व फ्रँचायजी ओनर राघवेंद्र आणि आनंद, सुनीलकुमार यांच्या हस्ते शोरुमचे उद्घाटन झाले. विजय सुब्रमण्यम यांनी रॉयलओक कंपनीबद्दल माहिती देत देशभरात असलेल्या शोरुमचा आढावा घेतला.
गुणवत्तापूर्ण व चांगल्या दर्जाचे फर्निचर तयार केले जात असल्याने बेळगावमधील ग्राहक हुबळी येथे येऊन फर्निचरची खरेदी करीत होते. त्या ग्राहकांकडून बेळगावमध्ये मोठ्या शोरुमची मागणी होत होती. याची दखल घेऊन एखाद्या घराला आवश्यक असलेले सर्व फर्निचर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. बेड, टीपॉय, सोफासेट, दिवाण, डबल बेड, डायनिंग टेबल-खुर्च्या, लाकडी व प्लायवूड यामध्ये उत्तम प्रतीचे फर्निचर उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या फ्लॅट अथवा घराची पाहणी करून त्यांना हवे असलेले फर्निचरदेखील तयार करून दिले जाणार आहे. यासाठी रॉयलओक कंपनीने तज्ञांची टीम तयार केली असल्याची माहिती उद्घाटनप्रसंगी देण्यात आली. लवकरच रॉयलओक प्रत्येक तालुक्यामध्ये आपले स्टोअर सुरू करेल, असा विश्वास अभयकुमार हरदी यांनी व्यक्त केला. फर्निचर खरेदीसाठी ईएमआयची सुविधा उपलब्ध असल्याचे महेश पंडित यांनी सांगितले. यावेळी बेळगावमधील अनेक मान्यवर उपस्थित होते.