कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत अ च्या विजयामध्ये इनानचे नाबाद शतक

06:55 AM Nov 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

19 वर्षाखालील वयोगटातील येथे सुरु असलेल्या तिरंगी वनडे मालिकेतील सामन्यात रविवारी अष्टपैलू मोहम्मद इनानच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारत अ ने भारत ब चा 26 धावांनी पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाने 50 षटकात 7 बाद 269 धावा जमविल्या. त्यानंतर भारत ब चा डाव 47.2 षटकात 243 धावांत आटोपला.

Advertisement

भारत अ च्या डावामध्ये केरळच्या अष्टपैलू मोहम्मद इनानने 6 षटकार आणि 12 चौकारांसह 74 चेंडूत नाबाद 105 धावांची खेळी केली. तत्पूर्वी भारत अ ची स्थिती 18 षटकात 5 बाद 68 अशी केविलवाणी होती. भारत अ संघातील विहान मल्होत्राने 6 चौकारांसह 42, अनमोलजीत सिंगने नाबाद 30 धावा जमविल्या. भारत ब तर्फे जगन्नाथन हेमचुडासेन, बी. के. किशोर आणि रोहित दास यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारत अ चे पहिले चार फलंदाज केवळ 13 धावांत तंबूत परतले. विनीतने 2 धावा केल्या तर कुंडुला खातेही उघडता आले नाही. रापोलिने 16 तर खिलान पटेलने 37 धावा केल्या. अनमोलजित सिंगने 1 षटकारासह 50 चेंडूत नाबाद 30 धावा जमविल्याने भारत अ ला 269 धावांपर्यंत मजल मारता आली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारत ब च्या डावामध्ये कर्णधार आणि सलामीचा फलंदाज अॅरॉन जॉर्जला रावतने खाते उघडण्यापूर्वी बाद केले. मोहम्मद मलिकने युवराज गोहिल आणि राहुल कुमार यांना केवळ 3 चेंडूमध्ये बाद केल्याने भारत ब ची स्थिती केविलवानी झाली. त्यानंतर वेदांत त्रिवेदी तंबूत परतला. भारत ब ने यावेळी 8 षटकात 4 बाद 42 धावा जमविल्या होत्या. भारत ब संघातील यष्टीरक्षक आणि फलंदाज हरवंश पांगलियाने हेमचुडासेनसमवेत शतकी भागिदारी केली. हेमचुडासेनने 45 धावा जमविल्या. भारत अ संघातील मल्होत्राने पांगलियाचा 99 धावांवर त्रिफळा उडविला. बुग्गाने 49 धावांचे योगदान दिले. रावत आणि मलिक यांनी भारत ब चे तळाचे फलंदाज लवकर बाद केल्याने भारत ब चा डाव 47.2 षटकात 243 धावांत आटोपला. या तिरंगी मालिकेत अफगाण हा तिसरा संघ आहे. आता भारत ब चा पुढील सामना अफगाण बरोबर येत्या मंगळवारी होईल तर येत्या गुरुवारी भारत अ आणि अफगाण यांच्यात प्राथमिक साखळी फेरीतल शेवटचा सामना खेळविला जाईल. 30 तारखेला या स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.

संक्षिप्त धावफलक - भारत अ 50 षटकात 7 बाद 269 (मोहम्मद इनान नाबाद 105, विहान मल्होत्रा 42, अनमोलजीत सिंग नाबाद 30, हेमचुडासेन, बी. के. किशोर आणि रोहित दास प्रत्येकी 2 बळी), भारत ब 47. 2 षटकात सर्व बाद 243 (पांगलिया 99, बुग्गा 49, हेमचुडासेन 45, रावत 4-34, मोहम्मद मलिक 4-49).

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article