For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : उरूण–ईश्वरपूरमध्ये महायुतीची सत्ता निश्चित

06:01 PM Nov 26, 2025 IST | NEETA POTDAR
sangli   उरूण–ईश्वरपूरमध्ये महायुतीची सत्ता निश्चित
Advertisement

                                                   ईश्वरपूरात महायुतीची ‘पूर्ण बहुमत’ची घोषणा;

Advertisement

ईश्वरपूर :  उरुण-ईश्वरपूरमध्ये महायुतीची सत्ता निश्चित येणार असून राज्य व केंद्रात महायुतीची सत्ता असल्याने पुढील पाच वर्षात भरीव निधी आणून विकास साधू नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांच्यासह सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन महायुतीच्या नेत्यांनी केले.

महायुतीच्या प्रचारार्थ उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अन्य नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी सामंत यां-नी ईश्वरपुरात एकहाती सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी स्वागत केले.

Advertisement

यावेळी विश्वनाथ डांगे म्हणाले, उरूण-ईश्वरपूर शहराचा सर्वांगीण विकास हा माझा केंद्रबिंदू आहे. नागरिकांनी दाखवलेला विश्वास व महायुतीच्या वचननाम्यातील सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

आपण मला आशीर्वाद द्यावा खा. धैर्यशील माने म्हणाले, महायुती शासनाच्या माध्यमातून भरीव निधी आणून विकास साधू आ. सदाभगाऊ खोत, निशिकांत भोसले-पाटील, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, चिमण डांगे, विक्रम पाटील, संजय कोरे, जयवंत पाटील, सागर खोत, केदार पाटील उपस्थित होते.

Advertisement

.