Kolhapur Crime : उचगावात पैसे डबल करण्याच्या आमिषाने साडेतीस लाख रुपयांची फसवणूक
उचगावात शेअर मार्केटच्या आमिषाने ३० लाखांची फसवणूक
उचगाव : माझ्याकडे शेअर मार्केटचे पैसे गुंतवा तुम्हाला डबल पैसे करुन देतो, तुमचे कर्ज निल करुन देतो, १५ टक्के परतावा देतो असे आमिष दाख-वून तीस लाख पंचावन्न हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुनिल पांडूरंग माने (वय ५२, रा. अमर विकास कॉलनी, आपटेनगर, नवीन वाशी नाका, शनिवार पेठ, ता. करवीर) याला गांधीनगर पोलिसांनी अटक केली.
रमेश पुंडलिक बागडी (वय ४५, रा. रायगड कॉलनी, वरुण विहार अपार्टमेंटजवळ, मणेर मळा, उचगाव) यांचा वैद्यकीय व्यवसाय आहे. त्यांची ओळख सुनिल माने यांच्याशी झाली. त्यानंतर सन २०२३ ते सन २०२४ पर्यंत माने यांनी माझ्याकडे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, तुम्हाला पैसे डबल करुन देतो, महिन्याला १५ टक्के इतका परतावा मिळवून देतो, असे आमिष दाखवूले. बागडी आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून बँक खात्यावरुन आणि रोख असे एकूण ३० लाख ५५ हजार रुपये घेतले. याची परतफेड न करता फसवणूक केली. फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून माने याला पोलिसांनी अटक केली.