For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन वर्षात खाणी कायमस्वरूपी सुरू

12:14 PM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन वर्षात खाणी कायमस्वरूपी सुरू
Advertisement

गृहमंत्री अमित शहा यांची म्हापसा जाहीर सभेत घोषणा : भाजपच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन

Advertisement

म्हापसा : गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनेकदा माझ्या कार्यालयात पायऱ्या झिजवल्या. आम्ही दोघांनी पंतप्रधान मोदीशी चर्चा करून गोव्यातील खाण लिजावर सुरू केल्या. येत्या दोन वर्षात गोव्यातील खाण व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करू, असे ठोस आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांनी म्हापसा येथे जाहीर सभेत बोलताना स्पष्ट केले. गोवा राज्याच्या नागरिकांनी विकसित भारत करण्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी गोव्यातून दोन्ही उमेदवार श्रीपाद नाईक व पल्लवी धेंपे यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहनही त्यंनी केले.

विरोधक स्वत:च्या मुलांचे भवितव्य घडविण्यात गुंग

Advertisement

सुमारे 25 हजार लोकांसमोर गृहमंत्री शहा बोलत होते. इंडि आघाडीकडे आज पंतप्रधानाचा उमेदवार नाही. या आघाडीचे सर्व नेते आपापल्या मुलांचे राजकीय भवितव्य घडविण्यात गुंग आहेत. प्रत्येकजण आपल्या मुली, मुलाला, भाच्यांना पंतप्रधान, मुख्यमंत्री करू पाहत आहेत, मात्र हे त्यांचे स्वप्न कदापि पूर्ण होणार नाही, असे गृहमंत्री म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी 4 जून नंतर काँग्रेस ढुंडो यात्रा सुरू करावी कारण काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. कुणीही काँग्रेसमध्ये राहणार नाही. गोवा राज्यासारख्या छोट्या राज्यांकडे काँग्रेसने कायम दुर्लक्ष केले. त्याउलट भाजप सरकारने राज्याचा सदैव विकास साधला असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

नरेंद्र मोदीजीनी भारताला बलशाली बनविले

गोवा राज्यात पल्लवी व श्रीपादभाऊंना दिलेले मत देशात मोदीना तिसऱ्यावेळी पंतप्रधान करणार आहे. 400 पारची यात्राही या मतदानाद्वारे पार होणार आहे. 23 वर्षे मंत्री राहून पंतप्रधान बनलेले नरेंद्रजी मोदी ज्यांच्यावर एकही आरोप, घोटाळा नाही. जीवन भारत मातेला समर्पित करणाऱ्या मोदीजीनी पंतप्रधान असताना एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. दुसऱ्या बाजूने राहुलबाबा ज्यांना थोडा राग आला की विदेशात सुट्टीसाठी जातो. नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली सलग 10 वर्षे नेतृत्व चालवून भारत देशाला बलशाही बनविले आहे. दुसऱ्या बाजूने घमेंडी गठबंधन आहे. शरद पवार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, राहुल बाबा देश सांभाळू शकणार नाही.

सर्जिकल स्ट्राईकची किमया मोदीनी केली

पाकिस्तानातून मालिया आलीया जालीया येत होते आणि बॉम्बस्फोट करून जात होते. कुणीही काही बोलत नव्हते. 2014 मोदी पंतप्रधान झाले. त्यांनी पाकिस्तानच्या घरात घुसून सर्जिकल ट्राईक करून पाकिस्तानची स्वच्छता करण्याचे  काम केले. मोदीने या देशाला आतंकवादापासून मुक्त केले. मोदीनी काश्मिरला भारतला जोडले आहे.

तीन वर्षांत साकारले राममंदिर

मोदी सरकार आल्यावर अवघ्या वर्षांनी राममंदिर पूर्ण झाले.  राहुल बाबा, शरद पवार, प्रियांका गांधी आदींना निमंत्रण देऊनही अयोध्येला गेले नाही. कारण त्यांना वोट बँकची भीती होती. आता सोमनाथ मंदिरही सोन्याचे उभे राहत आहे असे गृहमंत्री म्हणाले. गोवा राज्य विकसित व आत्मनिर्भर करण्यासाठी राज्यातून दोन्ही उमेदवारांना कमळावर शिक्का मारून निवडून आणा असे आवाहन शहा यांनी केले. यावेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री विश्वजित राणे, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, सुदिन ढवळीकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मंत्री गोविंद गावडे, बाबुश मोन्सेरात, उपसभापती जोशुआ डिसोझा, जेनिफर मोन्सेरात, डिलायला लोबो, मायकल लोबो, दिव्या राणे, दिगंबर कामत, राजेश फळदेसाई, जीत आरोलकर, केदार नाईक, प्रवीण आर्लेकर, डॉ. चंद्रकांत पंडित, माजी आमदार दयानंद मांद्रेकर, दयानंद सोपटे, उमेदवार पल्लवी धेंपे, महिला मोर्चा अध्यक्ष आरती बांदोडकर, ग्लेन टिकलो, ऊपेश कामत, राजेश पाटणेकर, दिलीप पऊळेकर, दाजी साळकर, सिल्वेरीया डिसोझा, मंत्री नीळकंठ हळर्णकर आदी उपस्थित होते.

भारत देश येत्या दोन वर्षात तीन नंबरवर

म्हापशात भाजपा मजबूत आहे. 25 वर्षे भाजपला मतदान मिळत आहे. येत्या दोन वर्षात भारत देश तीन नंबरवर पोचणार आहे. आम्ही पल्लवी धेंपे व श्रीपाद नाईक यांना निवडून पंतप्रधानांना अन्य पाच वर्षे देऊया व हा देश विकसित कऊया, असे उपसभापती जोशुआ डिसोझा म्हणाले.

मोठ्या प्रमाणात मतदान करा : मंत्री गोविंद गावडे

कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे म्हणाले की, घटनेत आम्हाला मतदान दिले नसते तर आज आम्हाला प्रतिनिधीत्व करायला मिळाले नसते. संविधान आमच्या डोक्यावर मारले असे त्यांना म्हणायचे असल्यास दोन्ही मतदारसंघात कमळ फुलविण्याची गरज आहे.

श्रीपाद नाईकना भरघोस मतांनी निवडून द्यावे

श्रीपाद नाईकना भरघोस मतांनी निवडून देणे ही आमची सर्वांची जबाबदारी आहे, असे मंत्री नीळकंठ हळर्णकर म्हणाले. भारत देश यापुढेही नंबर 1 वर पोचणार आहे. आज विकसित देश करण्याचा आम्ही संकल्प केला आहे.

ज्यांच्याकडे कॅप्टनच नाही ते देशाबद्दल काय बोलतात

पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, 2014 पंतप्रधान मोदी यांनी सुऊवात केली तेव्हा भारत देशाचा प्रवास वेगळ्या दिशेने प्रारंभ झाला. काँग्रेसला विचारायला पाहिजे आमचा कॅप्टन मोदी तर तुमचा कॅप्टन कोण? देश कितीही तोडायचा प्रयत्न केला तरी ते होणार नाही. जे संकल्प मोदीने घेतले ते पूर्ण करून दाखविले. धर्माच्या आधारावर कोण खेळतात ते खेळो आम्ही श्रीपाद नाईकना षटकार मारण्यास मदत करू व पल्लवी धेंपेना दक्षिणेत विजयी कऊया, असे रोहन खंवटे म्हणाले.

मला मत देणे म्हणजे मोदीना मत देणे : पल्लवी धेंपे

दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपे म्हणाल्या की, फिर एक बार मोदी सरकार करण्यास आम्ही एकत्रित आलो आहोत. तिसऱ्यावेळी पंतप्रधान मोदीना करण्याचा आम्ही ठरविले. मोदीच्या 10 वर्षाच्या कारकीर्दीत राज्यात पायाभूत सुविधा तसेच राज्याचा विकास झाला. मला मत देणे म्हणजे मोदीना मत देणे. आपण राज्यात प्रामाणिकपणे काम करणार आहे, मला सर्वांनी पाठिंबा दिला आहे, असेही त्या म्हणाल्या.

वेगवेगळ्या योजनाद्वारे आम्ही परिवर्तन करू : विश्वजित

आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, आम्ही मोदी परिवार म्हणून घरोघरी फिरले आहोत. आज देशात केंद्रातून विश्वगुरू मोदी तिसऱ्यावेळी देशाचे पंतप्रधान होण्याच्या तयारीत आहे.

मोदीजीनी विविध योजना राबविल्या : तानावडे

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, ही आमच्यासाठी वेगळी निवडणूक आहे. विकसित भारत आम्हाला पुढे न्यायचा आहे. काँग्रेस सरकारात फक्त घोटाळेच झाले. 2014 मध्ये 140 योजना देशभरात राबविल्या. गोव्यातही त्याचा लाभ मिळाला. देशाच्या कानाकोपऱ्यात सरकारी अधिकाऱ्यांना पाठवून दिलेल्या योजनांची माहिती जाणून घेतली. सबका साथ सबका विकास, सबका विश्वास हे आम्ही म्हणतो. नरेंद्र मोदीच्या सरकारात 100 ऊपये पाठविले तर शेवटच्या माणसाला 100 ऊपये मिळतात. ते काँग्रेसमध्ये 15 पैसेच मिळत होते. येणाऱ्या पाच वर्षात गरिब कल्याण योजना चालूच ठेवणार आहे.

काँग्रेसला त्यांचा पंतप्रधान कोण आहे हे माहीत नाही

त्यांना माहीत नाही काँग्रेस गठबंधनाचा प्रधानमंत्री कोण आहे. मोदीजी हा देश पुढे नेण्यासाठी झटत आहे. आर्थिकदृष्ट्या भारत देश 11 व्या स्थानी होता तो आज पाचव्या स्थानी पोहोचला आहे. ते 2047 पर्यंत पहिल्या स्थानी येणार आहे. उत्तर गोव्यात 1 लाख दक्षिणेत 50 हजारहून अधिक मतांनी आम्हाला निवडून द्यायचे आहे. म्हापसा अर्बन बँकचे काँग्रेसच्या उमेदवाराने काय केले हे सर्वांना माहीत आहे. भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्या असे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले.

55 वर्षात काँग्रेसने भारत देश स्थगित ठेवला- श्रीपाद नाईक

यावेळी बोलताना खासदार श्रीपाद नाईक म्हणाले की, आपल्यास गोव्याच्या जनतेने सलग पाचवेळा निवडून दिले. सर्वांच्या विश्वासात पुन्हा सहाव्यांदा विजयी होण्यास निवडणूक रिंगणात ठेवले. सर्व देश पुढे गेले मात्र आमचा देश तिथेच राहिला. 55 वर्षे काहीच न करता हा देश तिथेच स्थगित ठेवला. मोदीने विकासच नव्हे तर देशाला एक वेगळे नाव कमावून दिले. 2047 आम्हाला हा देश विकसित करायला पाहिजे. मात्र विरोधक मोदीना अपयश करण्यासाठी अपशकून करीत आहेत. मोदीना पुन्हा सत्ता देण्याचे आम्ही ठरविले आहे. मोदीची व शहाची सत्ता आणणे काळाची गरज आहे. येणाऱ्या 7 तारखेला भाजपला मत देऊन मोदीची सत्ता आणावी, असे उमेदवार श्रीपाद नाईक म्हणाले.

35 हजार कोटीपेक्षा अधिक कामे मोदी सरकारने केली

काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप बँक लुटारू आहेत. त्यालाच पुन्हा तिकीट दिली आहे. सर्वांचे पैसे तेथे अडकले आहेत. अशा बँक लुटारूला आम्ही थारा देणार नाही. दुसरा उमेदवार विरियातो फर्नांडिस आहे. त्याने बाबासाहेबांचा अपमान केला आहे. अशा दोघांनाही घरी पाठविण्याची गरज आहे. काँग्रेसने धर्माचे राजकारण केले. उत्तर गोव्यात आम्ही आहे तेथे असंख्य प्रकल्प करू शकले. राज्यात 35 हजार कोटी पेक्षा कामे केली ती भाजपने. गोव्यात मनोहर पर्रीकरांच्या कार्यकाळात विकास सुरू झाला. विकासाची स्वप्ने साकार करण्यासाठी गॅरंटी आहे. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी नरेंद्र मोदीना मत द्या, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

Advertisement
Tags :

.