महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेअरबाजारात सेन्सेक्स निर्देशांक अल्पशा वाढीसह बंद

06:33 AM Nov 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निफ्टी 6 अंकांनी घसरणीत : पॉवरग्रिड कॉर्पचा समभाग चमकला

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

सोमवारी दिवसभरात शेअरबाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. शेवटी सपाट स्तरावर बंद होण्यात बाजार यशस्वी झाला. पॉवरग्रिड कॉर्प या ऊर्जा क्षेत्रातील कंपनीचे समभाग 4 टक्के तेजीसह बंद झाले.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 9 अंक वाढत 79,496 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 6 अंक घसरणीसह 24,141 अंकांवर बंद झाला. सोमवारी पॉवरग्रिड कॉर्पचे समभाग 4 टक्के वाढले पण एशियन पेंटस्चे मात्र 8 टक्के घसरणीत राहिले होते.

हे समभाग तेजीत

ऊर्जा क्षेत्रातील पॉवरग्रिडचे समभाग सोमवारी मजबूत दिसून आले. 4.29 टक्के वाढत 329 रुपयांवर पोहचले होते तर आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसचे समभाग 1.65 टक्के वाढत 1860 रुपयांवर पोहचले होते. यासोबत आयटी कंपन्यांपैकी एचसीएल टेकचे समभाग 1.63 टक्के वाढत 1867 रुपयांवर तर टेक महिंद्राचे 1.36 टक्के वाढीसह 1704 रुपयांच्या स्तरावर बंद झाले. टीसीएसचे समभागही वधारलेले होते.

हे समभाग घसरणीत

सर्वाधिक नुकसानीत राहिले ते रंग उत्पादक कंपनी एशियन पेंटस्चे समभाग. सोमवारी 8 टक्के घसरणीसह 2543 रुपयांवर तर जेएसडब्ल्यू स्टीलचे 1.75 टक्के घसरणीसोबत 979 रुपयांवर बंद झाले. टाटा स्टीलचे समभाग 1.74 टक्के घसरत 145 रुपयांवर स्थिरावले व बजाज फायनान्सचे समभाग 1.70 टक्के कमकुवत होत 6779 रुपयांवर बंद झाले.

विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांच्या कामगिरीकडे पाहता सोमवारी बँकिंग आणि आयटी क्षेत्राच्या निर्देशांकाने तेजी दाखवली होती. आयटी निर्देशांक 1.28 टक्के वाढत 42,690 स्तरावर तर बँकिंग निर्देशांक 0.61 टक्के वाढीसह 51,877 च्या स्तरावर बंद झाला. ऑटो निर्देशांक 0.32 टक्के घसरणीसह 23,729 च्या स्तरावर तर निफ्टी फार्मा निर्देशांक 0.88 टक्के घसरत 22,344 स्तरावर बंद झाला.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article