महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एकमेव कसोटीत लंकन संघ सुस्थितीत

06:50 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अफगाण 42 धावांनी पिछाडीवर : इब्राहिम झद्रनचे नाबाद शतक

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

Advertisement

अफगाणबरोबर सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर यजमान लंकेची स्थिती सुस्थितीत असून हा संघ आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. या सामन्यात अफगाणचा संघ अद्याप 42 धावांनी पिछाडीवर असून त्यांनी दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करताना 1 बाद 199 धावा जमविल्या. या सामन्यात अफगाणचा पहिला डाव 198 धावात आटोपल्यानंतर लंकेने 6 बाद 410 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचे शेवटचे 4 गडी 29 धावात तंबुत परतले. लंकेचा पहिला डाव 109.2 षटकात 439 धावांवर आटोपल्याने लंकेने अफगाणवर पहिल्या डावात 241 धावांची भक्कम आघाडी मिळविली. लंकेच्या पहिल्या डावात अँजेलो मॅथ्यूज आणि दिनेश चंडीमल यांनी शानदार शतके झळकविली. करुणारत्नेने 77 धावांची खेळी केली. समरविक्रमाने 27 धावा जमविल्या. अफगाणतर्फे नावेद झद्रन प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 83 धावात 4 तसेच निजत मसुद आणि कयास अहमद यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. 241 धावांनी पिछाडीवर असलेल्या अफगाणने आपल्या दुसऱ्या डावाला दमदार सुरुवात केली. सलामीच्या इब्राहिम झद्रनने शानदार नाबाद शतक झळकविताना नुरअली झद्रन समवेत सलामीच्या गड्यासाठी 106 धावांची शतकी भागिदारी केली. नुरअली झद्रन असिता फर्नांडोच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 5 चौकारांसह 47 धावा जमविल्या. इब्राहिम झद्रन आणि रेहमत शहा यांनी दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य 93 धावांची भागिदारी केली. इब्राहिम झद्रनने 217 चेंडूत 11 चौकारांसह नाबाद 101 तर रेहमत शहाने 98 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 46 धावा जमविल्या आहेत. अफगाणचा संघ अद्याप 42 धावांनी पिछाडीवर असून या सामन्यातील खेळाचे दोन दिवस बाकी आहेत.

संक्षिप्त धावफलक - अफगाण प. डाव 62.4 षटकात सर्व बाद 198, लंका प. डाव 109.2 षटकात सर्व बाद 439 (अँजेलो मॅथ्यूज 141, चंडीमल 107, करुणारत्ने 77, समरविक्रमा 27, नावेद झद्रन 4-83, मसुद 2-76, कयास अहमद 2-98), अफगाण दु. डाव 75 षटकात 1 बाद 199 (इब्राहिम झद्रन खेळत आहे 101, नुरअली झद्रन 47, रेहमत शहा खेळत आहे 46, अवांतर 5, असिता फर्नांडो 1-35).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article