नोकरीच्या नावाने ‘प्रिया’ने घातला गंडा
डिचोलीतील अनेकांना लाखो रूपयांना लुबाडले : पोलीस कॉन्स्टेबलच्या सहाय्याने उकळले पैसे
डिचोली : रेल्वे खात्यात तसेच इतर ठिकाणी नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून डिचोलीतील तसेच विविध भागातील अनेकांना लाखो ऊपयांना गंडा घालणाऱ्या महिलेच्या विऊद्ध डिचोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ती महिला डिचोलीतून गायब झाल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणात एका पोलीस कॉन्स्टेबलचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून या प्रकरणात अनेकांचे लाखो ऊपये बुडाल्याची भीती व्यक्त कऱ्ण्यात येत आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र काल बुधवारी अनेकांनी डिचोली पोलीस ठाण्यात सादर महिला व पोलीस कॉन्स्टेबलच्या विरोधात वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान सदर प्रकरण गंभीर असून स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी बुधवारी डिचोली पोलीस ठाण्यात दाखल होऊन तातडीने याबाबत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली. आमदार शेट्यो यांनी उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांना फोनवरून संपर्क साधून या प्रकरणात दोषी असलेल्यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.
रेल्वेत मिळणार पाच नोकऱ्या
या प्रकरणी 16 ऑगस्ट रोजी अनिकेत दलवाई (बोर्डे, डिचोली) यांनी पोलिसात तक्रार दिली होती. सादर तक्रारीत प्रिया अजय यादव ही महिला भाड्याने डिचोलीत एका अपार्टमेंटमध्ये राहत आहे. सदर महिलेने आपल्या कोल्हापूर येथील दोन जमिनी रेल्वे ऊळासाठी जाणार असल्याने त्याच्याबदल्यात आपल्याला पाच नोकऱ्या मिळणार असून त्या सर्व पाचही नोकऱ्या तुम्हाला देऊ असे सांगितले आणि प्रत्येक पोस्टसाठी दहा लाख रूपयांची मागणी केली होती. त्यानुसार जुलै 23 मध्ये तिला दहा लाख ऊपये दिले तसेच कर्नाटक व पुणे येथील दोन जणांनी तिला पाच लाख रूपये दिले.
निवडणुकीमुळे नोकरभरतीस विलंब
त्यानंतर काही कागदपत्र घेऊन काही दिवसांनी नोकरीसाठी कागदपत्रे तयार झाल्याचे सांगून उर्वरित रक्कम देण्याची मागणी केली. त्यानुसर काही रक्कम थेट जमा केली. तसेच काही रक्कम एका पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या इसमाच्या नावावर जो सादर महिलेने आपला भाऊ असल्याचे स्पष्ट केले होते. त्याच्या बँक खात्यावर जमा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पूर्ण पैसे दिल्यानंतर काही दिवसांनी एक इसम घरी आला. त्याने निवडणुकीमुळे नोकरभरतीस विलंब होत असल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकरणी कसलीच हालचाल झाली नाही. त्यामुळे तक्रार दखल केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान अश्याच प्रकारे वेगवेगळी करणे सांगून सादर महिलेने अनेकांना गंडा घातल्याचे उघडकीस आले असून बुधवारी अनेकांनी पोलिसात रितसर तक्रारी नोंदवण्याची प्रक्रिया केली आहे.