For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंतिम फेरीत आज दिल्ली कॅपिटल्स वि. ‘आरसीबी’ मुकाबला

06:58 AM Mar 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंतिम फेरीत आज दिल्ली कॅपिटल्स वि  ‘आरसीबी’ मुकाबला
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली कॅपिटल्सची गाठ आज रविवारी महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरशी पडणार आहे. यावेळी मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील फॉर्मात असलेला दिल्ली कॅपिटल्स संघ आपल्या दुसऱ्या प्रयत्नात नशीबवान ठरण्याची आणि महिला प्रीमियर लीगचे पहिल्यांदा विजेतेपद पटकावण्याची अपेक्षा बाळगून असेल.

गेल्या वर्षी लीगच्या उद्घाटनाच्या आवृत्तीत विजेतेपदापासून वंचित राहिल्यानंतर आणि अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सकडून सात गड्यांनी पराभूत झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने यंदा चांगली चमक दाखविली आहे. पाच संघांच्या गुणतालिकेत आठ सामन्यांतून 12 गुणांसह ते अव्वल स्थानी राहिलेले आहेत. त्यात लॅनिंगने आठ डावांत 308 धावा करत नेतृत्वास शोभेलशी कामगिरी केली आहे, तर दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू मॅरिझान कॅप व ऑस्ट्रेलियाची डावखुरी फिरकीपटू जेस जोनासेन या प्रत्येकी 11 बळींसह गोलंदाजांच्या यादीत आघाडीवर आहेत.

Advertisement

या मोसमात दिल्ली कॅपिटल्सचे फक्त दोनच पराभव मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सविऊद्ध नोंदले गेले आहेत. ते दोन सामने बाजूला ठेवल्यास त्यांची मोहीम जवळजवळ परिपूर्ण राहिली आहे. अंतिम फेरीत उतरताना निश्चितच त्यांचे पारडे जड असेल. कारण त्यांच्या आरसीबीविरुद्ध चार लढती झालेल्या असून ते कधीही आरसीबीकडून हरलेले नाहीत. दिल्ली कॅपिटल्सला स्फोटक शफाली वर्माकडून लॅनिंगच्या बरोबरीने वेगवान सुरुवातीची अपेक्षा असेल. जेमिमाह रॉड्रिग्सने मधल्या फळीत चांगली कामगिरी केलेली आहे. परंतु लॅनिंगला अष्टपैलू अॅलिस कॅप्सी आणि कॅप यांच्याकडून अधिक योगदानाची अपेक्षा असेल.

गोलंदाजीच्या आघाडीवर जोनासेन ही स्टार परफॉर्मर राहिली आहे तसेच कॅप आणि शिखा पांडे यांनीही चांगले योगदान दिले आहे. डावखुरी फिरकीपटू राधा यादवही 10 बळी घेऊन प्रभावी ठरलेली आहे आणि कोटलाच्या तुलनेत येथील संथ खेळपट्टीवर दिल्ली कॅपिटल्स निश्चितपणे फिरकीपटूंवर जास्त अवलंबून असेल. दुसरीकडे, आरसीबीने लीग टप्प्यात तिसरे स्थान पटकावले होते, परंतु त्यांनी शुक्रवारी येथे झालेल्या एलिमिनेटरमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पाच धावांनी पराभूत केले.

अष्टपैलू एलिस पेरी ही आरसीबीच्या यशाची गुऊकिल्ली असेल. कारण 312 धावांसह सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरलेली ही ऑस्ट्रेलियन खेळाडू गोलंदाजीतही प्रभावशाली राहिलेली आहे आणि तिने सात बळी मिळविलेले आहेत. शुक्रवारी मुंबई इंडियन्सविऊद्ध पेरीने अष्टपैलू कामगिरी केली नसती, तर निकाल वेगळा लागू शकला असता. पेरीला फलंदाजीत कर्णधार स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन, रिचा घोष आणि सोफी मोलिनक्स यांची साथ मिळेल. तथापि, जर दिल्ली कॅपिटल्सला रोखायचे असेल, तर आरसीबीला गोलंदाजांच्या, खास करून रेणुका सिंह, श्रेयंका पाटील, जॉर्जिया वेरहॅम यांच्या प्रयत्नांची गरज लागेल.

संघ-दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग (कर्णधार), तानिया भाटिया, लॉरा हॅरिस, जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, एलिस कॅप्सी, मारिझान कॅप, शिखा पांडे, अॅनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, मिन्नू मणी, पूनम यादव, अऊंधती रे•ाr, तीतस साधू, राधा यादव, अश्विनी कुमारी, अपर्णा मोंडल, व्ही. स्नेहा दीप्ती.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : स्मृती मानधना (कर्णधार), ऋचा घोष, दिशा कासट, सभिनेनी मेघना, इंद्राणी रॉय, सतीश शुभा, हीदर नाइट, सिमरन बहादूर, नदिन डी क्लार्क, सोफी डिव्हाईन, श्रेयंका पाटील, एलिस पेरी, आशा शोभना, एकता बिश्त, केट क्रॉस, सोफी मोलिनक्स, श्रद्धा पोखरकर, रेणुका सिंह, जॉर्जिया वेरहॅम.

Advertisement
Tags :

.