For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उचगावलगत ऐनवाड शेतात तळीरामांचा धुडगूस

10:22 AM Feb 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
उचगावलगत ऐनवाड शेतात तळीरामांचा धुडगूस
Advertisement

शेतवडीत काचा टाकल्याने शेतकरी जखमी होण्याच्या घटना : शेतकऱ्यांतून तीव्र संताप : पोलिसांकडून कडक गस्तीची गरज

Advertisement

वार्ताहर /उचगाव

उचगाव गावालगतच्या ऐनवाड या शेतवडीमध्ये जाणाऱ्या बैलगाडी मार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतीत तळीरामांनी दारू ढोसून रिकाम्या बाटल्या फोडून काचा अस्ताव्यस्त टाकल्याने याचा मोठा धोका शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांना सदर काचा लागून जखमी झाल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर तातडीने संबंधित खात्याने व पोलीस खात्याने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. अलीकडे तर तळीरामांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामध्ये युवकांचा मोठा सहभाग असून, रात्री आठनंतर जवळपास बारा ते एक वाजेपर्यंत अनेक युवक मिळेल त्या जागेत बसून दारू ढोसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Advertisement

शेतकरी वर्गाला नाहक त्रास

उचगाव परिसरातील मळेकरणीदेवीच्या आमराईत सभोवती आणि बाजूचा परिसर तसेच उचगाव-कोवाड मार्गावरील माळ जमिनीत व अॅप्रोच रोडपासून शेतवडीत जाणारा बैलगाडी मार्ग आहे. या मार्गाच्या दुतर्फा रात्रीच्या वेळी सदर युवक दारू ढोसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दारू ढोसल्यानंतर खाली झालेल्या बाटल्या फोडून काचा शेतवडीत फेकून देणे, याचबरोबर प्लास्टिक ग्लास, तसेच प्लास्टिक पिशव्या, पत्रावळी, पाण्याचे बिसलरी खाली बाटल्या, असे अनेक टाकाऊ पदार्थ शेतवडीत टाकत असल्याने याचा नाहक त्रास शेतकरी वर्गाला सहन करावा लागत आहे. शेतकरी वर्गाची शेतवडीत सध्या बटाटा व भाजीपाला, उसाची नुकतीच लागवड करण्यात आलेली आहेत. अशी कोवळी पिके सध्या शेतात असताना रिकामी झालेल्या बाटल्या फोडल्या जातात व रिकामी प्लास्टिक बाटल्या फेकण्याचे प्रकार वाढत असल्याने शेती कशी करावी आणि शेतकरी वर्गाने शेतवडीत कसे जावे, हा मोठा प्रŽ शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. मातीत सदर तुटलेल्या काचा दिसत नसल्याने यातून शेतकरी वर्गाची ये-जा करताना त्या काचा लागून शेतकरी जखमी झाल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. यासाठी संबंधित खाते याचबरोबर उचगावला 24 तास पोलिसांची गस्त असतानाही असे प्रकार होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यावर पोलीस खात्यानेही अशा भागात गस्त घालून व धाड टाकून बंदोबस्त करावा आणि अशा सापडणाऱ्या तळीरामांना एकदा पोलीस स्टेशनची हवा दाखवावी, अशी मागणी तमाम शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

तळीरामांवर कारवाई करावी

सध्या आम्ही शेती करावी की करू नये, असा प्रŽ आता आमच्यासमोर पडला आहे. शेतात दारू पिऊन शिल्लक बाटल्या फोडल्याने व त्या पिकांतून दिसत नसल्याने या काचा लागून आम्ही घायाळ झालो आहोत. तरी तातडीने यावर बंदी घालावी आणि अशा तळीरामांना चांगला चोप देऊन शिक्षा करावी.

- किसन पाटील, शेतकरी उचगाव

Advertisement
Tags :

.