kolhapur : पुलाची शिरोलीत पूर्व वैमनस्यातून टोळक्याचा दांपत्यांवर ऐडक्याने हल्ला ; दोघे जखमी
पुलाची शिरोलीत दांपत्यावर ऐडक्याने हल्ला
पुलाची शिरोली : पुलाची शिरोली येथे पूर्व वैमनस्यातून दांपत्यासह मुलावरही ऐडक्याने हल्ला झाल्याने दोघे जखमी झाले. तर मुलगा थोडक्यात बचावला.मंगळवारी राञी उशिरा शिरोली पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपीस पडकण्याचा प्रयत्न केला पण तो फरार झाला. हा हल्ला रात्री साडेदहाच्या सुमारास सावंत काॅलनी येथे झाला.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, पुलाची शिरोली ता. हातकणंगले येथील दिगंबर रघुनाथ कांबळे वय ४० , आरती दिगंबर कांबळे ३५ व मुलगा वल्लभ दिगंबर कांबळे ११ हे सर्वजण जेवणानंतर शतपावली करत सब्र मल्टी ऑनलाईन सर्व्हिसेसच्या समोर आले.पूर्व वैमनस्यातून अगोदरच दबा धरून बसलेल्या टोळक्याने हा हल्ला केला.
या हल्ल्यात दिगंबर रघुनाथ कांबळे वय ४० , आरती दिगंबर कांबळे वय ३५ हे दोघे जखमी झाले तर मुलगा वल्लभ दिगंबर कांबळे वय ११ हा थोडक्यात बचावला हा हल्ला वैभव बेडेकर वय २५ रा. लालबहादूर हौसिंग सोसायटी याने केला आहे. त्यांने ऐडक्याने हल्ला केल्याने दिगंबर याच्या डोक्यात , हातावर जोरात वार झाल्याने त्याच्या हाताचे बोट तुटले असल्याचे समजते. संशयीत आरोपीचा पोलिस शोध घेत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.