Satara : साताऱ्यात जुना आरटीओ चौकात मध्यरात्री तरुण-तरुणीचा धिंगाणा !
साताऱ्यात रात्री ३.३० वाजता युवक-युवतींचा मोठा गोंधळ
सातारा : सातारा शहरातील जुना आरटीओ चौक परिसरात शुक्रवारी मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास चार तरुण-तरुणी धिंगाणा घालताना पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान आढळून आले. कडाक्याच्या थंडीत भर चौकात १७ ते २० वर्ष वयातील तरुण रस्त्यावर मोठ्याने आवाज करत होते. पोलिसांना पाहून दोन तरुणांनी धूम ठोकली. यामध्ये इयत्ता नववीत शिकणारी युवती आणि एक अल्पवयीन युवकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
तरुणी ही इयत्ता नववीत शिक्षण घेत असून तिचे आई, वडील नोकरीनिमित्त मुंबईत राहतात. ती तिच्या आजीकडे साताऱ्यात राहत असल्याची माहिती समोर आली. सर्वांचे वय साधारण १५ ते २० च्या दरम्यान असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांच्या तत्पर दिलेल्या कारवाईने टळला माहितीनुसार, अनर्थ पोलिसांनी शुक्रवारी रात्री नियमित पेट्रोलिंग करत असताना बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डी. एस. वाळवेकर यांच्या नजरेत हा प्रकार आला.
त्यांनी युवकांना अडवून त्यांची चौकशी केली, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने बिट मार्शलला याबाबत कळवले. पोलिसांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे कोणताही अपघात किंवा गंभीर प्रकार घडण्यापूर्वी परिस्थिती पोलिसांनी हाताळली.