कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Miraj News : मिरज तालुक्यात शेतजमीनीच्या वादातून जोरदार राडा; 4 जखमी

03:05 PM Dec 03, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                            जमिनीच्या वादातून दोन्ही गटांमध्ये तुफान मारहाण

Advertisement

मिरज : मिरज तालुक्यातील संतोषवाडी येथे शेतजमीनीच्या वादातून दोन गटात तुफान राडा झाला. एकमेकांच्या अंगावर चटणी पूड फेकून कोयता व कुऱ्हाडीने मारामारी झाली. या मारहाणीत चौघेजण जखमी झाले आहेत. याबाबत संभाजी खुशाबा जाधव (वय ४२) आणि संजय सावंता भोसले (वय ५२) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे.

Advertisement

त्यानुसार पोलिसांनी दोन्ही गटाकडील चार महिलांसह दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. संभाजी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संभाजी जाधव, त्यांच्या पत्नी विजया, भाऊ सचिन व पत्नी कविता असे चौघेजण शेतात काम करीत होते. यावेळी संशयीत संजय सावंता भोसले, अभिषेक संजय भोसले व शालन संजय भोसले असे तिघेजण संगनमत करुन शेतात आले.

त्यांनी शेतात काम करणाऱ्या जाधव कुटुंबियांचे व्हिडीओ चित्रण केले. संजय भोसले यांनी वेडेवाकडे बोलले. याचा जाब विचारल्यानंतर संशयितांनी तुम्ही शेतात यायचे नाही, असे म्हटले.त्यानंतर संजय यांचा भाऊ सचिन यांना फोन करुन शेतात बोलावून घेतले. त्यांच्या अंगावर चटणी फेकली. शिवीगाळ करुन दमदाटी केली. यावेळी संशयित शालन भोसले या महिलेने सचिन जाधव यांना कोयत्याने मारहाण केली. तर अन्य संशयितांनी अभिषेक भोसले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत संभाजी जाधव, भाऊ सचिन जधव असे दोघेजण जखमी झाले आहेत.

तर संजय सावंता भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेताचा न्यायालयीन वाद सुरु आहे. याचा राग मनात धरुन संशयीत नंदकुमार शिवाजी भोसले, संभाजी खुशाबा जाधव, सचिन खुशाबा जाधव, विजया संभाजी जाधव, सुनिता नंदकुमार भोसले, शहाजी भोसले, सचिन जाधव व सचिन याची पत्नी आदींनी संगनमत करुन शेतात येऊन भांडण काढले. सचिन जाधव यांनी संजय यांचा मुलगा अभिषेक भोसले याला काठीने मारहाण केली.

विजया जाधव यांनी डोळ्यात चटणी पूड फेकली. व कुऱ्हाडीच्या तुंब्याने पत्नी शालन हिच्या डोक्यात मारुन जखमी केले. तर अन्य संशयितांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत संजय भोसले, पत्नी शालन भोसले व मुलगा अभिषेक भोसले असे तिघेजण जखमी झाले आहेत.
याबाबत दोन्ही गटांनी मिरज ग्रामीण पोलिसात परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही गटाकडील चार महिलांसह दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ग्रामीण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :
#FarmFight#IndiaNews#LandDispute#mirajnews#PoliceInvestigation#RuralCrime#RuralViolence#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaChutneyFight
Next Article