महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खादरवाडी शिवारात भाताच्या तीन गंज्यांना आग

10:19 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान : कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ : नुकसानभरपाई देण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर /किणये

Advertisement

खादरवाडी शिवारात मळणी करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या तीन भातगंज्यांना आग लागली आहे. या आगीत तिन्ही भातगंज्या जळून खाक झाल्या आहेत. यामुळे मळणी करण्याआधीच भात व पिंजर जळाले. त्यामुळे शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. आग लागण्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. यामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. खादरवाडी स्मशानभूमीनजीक पारकट शिवारात शंकर धोंडिंबा शिवनगेकर यांनी तीन भाताच्या गंज्या ठेवल्या होत्या. भात कापणी करून मळणी करण्यासाठी या गंज्या ठेवण्यात आल्या होत्या. बुधवारी दिवसभर शंकर शिवनगेकर हे शिवारातच होते. सायंकाळी 5 वाजता ते घरी आले. आणि साडेसातच्या दरम्यान गावातील एका शेतकऱ्याने तुमच्या भातगंज्या जळत असल्याची माहिती त्यांना दिली. यावेळी शिवणगेकर कुटुंबीय धावत शिवारात गेले. मात्र तोपर्यंत तिनही भाताच्या गंज्यां जळून खाक झाल्या. यामुळे शिवणगेकर शेतकरी हतबल झाले आहेत. गंज्यांतून सुमारे 30 पोती इतके भात मिळणार होते. तसेच दोन ट्रॅक्टर ट्रॉली पिंजर होणार होते. मळणी करण्याआधीच हे सर्व जळाल्यामुळे शिवणगेकर कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच गावातील काही  प्रमुख पंचमंडळी व शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. यानंतर अग्निशमन दल व पोलीस खात्याला याबद्दल माहिती देण्यात आली. वडगाव ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले रात्री अग्निशमन दलाचे वाहन खादरवाडी येथे आले. मात्र सदर शिवाराकडे जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे अग्निशमन दलाचे वाहन शिवारापर्यंत पोहोचू शकले नाही. तोपर्यंत आगीत गवत गंज्याही जळून खाक झाल्या. अशी माहिती गोपाळ शिवणगेकर यांनी दिली.

अन्य शेतकऱ्यात भीती

गुरुवारी सकाळी पुन्हा वडगाव ग्रामीणच्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा व पाहणी केली आहे. तसेच तलाठी हनुमंत यांनीही पाहणी केली. भात गंज्यांना आग लागण्याचा प्रकार घडला असल्यामुळे नुकसानभरपाईची मागणी होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article