For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केरळमध्ये पीडितेवरच वकिलाकडून बलात्कार

06:27 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
केरळमध्ये पीडितेवरच वकिलाकडून बलात्कार
Advertisement

संबंधिताविरोधात लुकआउट नोटीस जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ कोची

केरळमधील उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या एका वकिलाने बलात्कार पीडितेवरच बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी केरळ पोलिसांनी उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील पी. जी. मनू यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. बलात्कार केल्याचा आरोप झाल्यापासून ते फरार आहेत. उच्च न्यायालयाने अॅड. मनू यांना आत्मसमर्पण करण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली होती.

Advertisement

पीडितेवर बलात्कार करण्याचे प्रकरण ऑक्टोबर 2023 मधील असल्याचे सांगण्यात आले. एर्नाकुलम ग्रामीण एसपींना दिलेल्या तक्रारीत महिलेने बलात्कारासोबतच आपले अश्लील फोटोही काढल्याचे सांगितले. आयपीसी कलम 376 अंतर्गत लैंगिक छळ व्यतिरिक्त पोलिसांनी आयटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केला आहे. 25 वषीय बलात्कार पीडित मुलगी 2018 मध्ये घडलेल्या घटनेच्या संदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यासाठी अॅड. मनू यांच्याकडे गेली होती. यानंतर वकिलांनी सदर पीडितेवर तीनवेळा बलात्कार केला आणि अश्लील छायाचित्रेही काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, 9 ऑक्टोबर रोजी पीडित महिला आपल्या आई-वडिलांसोबत वकिलांच्या कडवंथरा कार्यालयात गेली असताना आरोपीने तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. वकिलांनी महिलेच्या पालकांना बाहेर थांबण्यास सांगून पीडितेशी चर्चा करण्याच्या बहाण्याने दरवाजा बंद केला. त्यानंतर खोलीत तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने वकिलाच्या या कृतीला विरोध केला तेव्हा त्याने 2018 चा खटला उलटवून तिला आरोपी बनवण्याची धमकी दिली. वकिलाने 11 ऑक्टोबरला पुन्हा महिलेला बोलावून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. त्यानंतर तो व्हॉट्सअॅप कॉल आणि चॅटच्या माध्यमातून अश्लील बोलत असे, असे महिलेने सांगितले. त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी पीडितेच्या घरी कोणी नसताना वकिलाने बळजबरीने तिच्या घरात घुसून तिसऱ्यांदा बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आता पोलिसांनी आरोपी देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी लुकआउट नोटीस जारी केली आहे. या नोटिशीमुळे त्याला विमानतळावर किंवा बंदरावर ओळख पटवून अटक केली जाऊ शकते.

Advertisement
Tags :

.