Karnataka : कॉंग्रेसचे 'कानात फुले माळून' सरकार विरोधात अनोखे आंदोलन
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी राज्याच्या अर्थसंकल्प सादरीकरणासाठी एका अनोख्या आंदोलनाचे नेतृत्व केले. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने 2018 च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण न करता लोकांची फसवणूक' केली असल्याचा आरोप करून विरोधी पक्षांनी आपल्य़ा उजव्या कानामागे एक फूल माळून सरकारचा निषेध केला.
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि कर्नाटक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यासह काँग्रेस नेते आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. या सर्व सदस्यांनी सरकारचा निषेध करण्यासाठी कानात फुले घालून दिसले. भाजप सरकारने मागील अर्थसंकल्प आणि 2018 च्या जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण न करून कर्नाटकातील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असून या वर्षी कर्नाटक सरकार निवडणुकिला सामारे जाणार आहे. भाजपवर आरोप करताना सिद्धरामय्या म्हणाले, "भाजपने 2018 मध्ये दिलेल्या 600 आश्वासनांपैकी 10 टक्केही पूर्ण करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे." काँग्रेसने 2013 मध्ये दिलेल्या 165 पैकी 158 आश्वासनांची पूर्तता केल्याचा दावाही त्यांनी केला.