Sangli Crime : ईश्वरपूर पेठेत चोरट्यांनी सोन्या-चांदीचा 5 लाख 78 हजारांचा ऐवज केला लंपास
ईश्वरपूरच्या घरात भर दुपारी चोरट्यांचा डल्ला
ईश्वपूर : वाळवा तालुक्यातील पेठ येथील गणेश सुभाष कोळेकर (४१) यांच्या घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप फोडून चोरट्यांनी सुमारे पावणे सहा लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला. ही घटना भर दुपारी पावणे बारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली.
कोळेकर यांचे घर फोडून चोरट्यांनी दोन तोळे वजनाचाराणीहार, सब्बा तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, दीड तोळा वजनाचे सोन्याचे मिनीगंठण, एक तोळे वजनाची सोन्याची चैन, एक तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, एक तोळा वजनाची सोन्याची अंगठी, तीन ग्रॅम वजनाचे कानातले सान्याची रिंग, सहा ग्रॅम वजनाचे देवाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, तीन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या मनगट्या, रोख १३ हजार रुपये असा ५ लाख ७८ हजार रुपये ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
याप्रकरणी कोळेकर यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.